Jio Remove Installation Charges: BharatNet
बिझनेस

Jio ने आणली खूशखबर! 15 ऑगस्टपर्यंत मोफत वाय-फाय; वाचतील 1000 रुपये

Jio Remove Installation Charges: रिलायन्स जिओने 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या Jio AirFiber वापरकर्त्यांसाठी एक नवीन फ्रीडम ऑफर आणलीय.

Bharat Jadhav

रिलायन्स जिओने 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या Jio AirFiber वापरकर्त्यांसाठी एक नवीन फ्रीडम ऑफर आणलीय. जिओ आपल्या नवीन एअरफायबर वापरकर्त्यांना त्याच्या फ्रीडम ऑफर अंतर्गत 30 टक्के सूट देत आहे. ही ऑफर 26 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. ज्या ग्राहकांना घरी नवीन ब्रॉडबँड बसवायचा आहे. त्या ग्राहकांना नव्याने लाँच झालेल्या Jio फ्रीडम ऑफरचा फायदा मिळेल. कारण आता नवीन Jio AirFiber वापरकर्त्यांना इंस्टॉलेशन शुल्क भरावे लागणार नाहीये.

Jio Freedom Offer च्या घ्या संपूर्ण माहिती

जिओ आपल्या नवीन एअरफायबर वापरकर्त्यांना त्याच्या फ्रीडम ऑफर अंतर्गत 30 टक्के सूट देणार आहे. 26 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान नवीन कनेक्शन घेणाऱ्या सर्व एअरफायबर वापरकर्त्यांना रु. 1000 ची इन्स्टॉलेशन चार्ज सूट मिळेल. तीन महिने, 6 महिने आणि 12 महिन्यांचे प्लॅन निवडणाऱ्या सर्व नवीन AirFiber 5G आणि Plus वापरकर्त्यांकडून इंस्टॉलेशन शुल्क घेतले जाणार नाहीये. या ऑफरमध्ये 15 ऑगस्टपर्यंतच्या सर्व नवीन ॲक्टिव्हेशनसह सर्व नवीन आणि विद्यमान बुकिंग यात समाविष्ट आहेत.

युजर्सला मिळेल 1000 रुपयांची सूट

जे वापरकर्ते 3 महिने ऑल-इन-वन योजना निवडतात त्यांना 3,121 रुपये द्यावे लागतील. यात प्लॅनची ​​किंमत 2,121 रुपये आहे आणि इन्स्टॉलेशन चार्ज 1000 रुपये आहे. यामुळे योजनेची एकूण किंमत 3,121 रुपये होत असते.अशा परिस्थितीत आता 1,000 रुपयांच्या इन्स्टॉलेशन डिस्काउंटनंतर तुम्हाला 2,121 रुपये द्यावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT