Jio AirFiber Launched : जिओचे एअर फायबर लॉन्च! वायरलेस आणि हाय स्पीड इंटरनेटसह मिळणार जबरदस्त प्लान

What Is Jio Airfiber : Jio AirFiber कालपासून भारतात लाँच झाले आहे. त्याची प्लानही जाहीर करण्यात आला आहे.
Jio AirFiber Launched
Jio AirFiber Launched Saam Tv
Published On

Jio AirFiber :

Jio AirFiber कालपासून भारतात लाँच झाले आहे. त्याची प्लानही जाहीर करण्यात आला आहे. Jio AirFiber सह, वापरकर्त्यांना वायरलेस पद्धतीने हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल. अशा स्थितीत, Jio AirFiber काय आहे आणि ते कसे कार्य करेल हे जाणून घेऊया. वायर्ड ब्रॉडबँड कनेक्शनपेक्षा किती वेगळे आहे हे देखील पाहूयात.

ऑप्टिकल फायबर (Fiber) केबलचा वापर Jio फायबर किंवा इतर ब्रॉडबँड कनेक्शनद्वारे इंटरनेट प्रदान करण्यासाठी केला जातो. तथापि, Jio AirFiber या बाबतीत वेगळे आहे. कारण यामध्ये यूजर्सना इंटरनेट कनेक्शनसाठी फिजिकल वायरची गरज भासणार नाही. हाय स्पीड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ते Jio च्या 5G नेटवर्कचा वापर करेल. अशा स्थितीत ज्या ठिकाणी वायरद्वारे इंटरनेट उपलब्ध नाही अशा ठिकाणीही हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते.

Jio AirFiber Launched
Jio AirFiber : जिओ एअर फायबर नेमकं आहे तरी काय? खिशाला परवडेल का?

प्लग अँड प्ले राउटर

Jio AiFiber हे पोर्टेबल वायफाय (WiFi) हॉटस्पॉटसारखे आहे, जे फक्त प्लग करून ऑपरेट केले जाऊ शकते. त्यात एक राउटर असेल. यामध्ये इंटरनेट कनेक्शनसाठी वेगळी वायर जोडण्याची गरज नाही. यामुळे वायरलेस पद्धतीने हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल.

प्लानच्या किंमती जाणून घ्या

Jio आपल्या ग्राहकांना एअर फायबर आणि एअर फायबर मॅक्स नावाचे दोन प्लान ऑफर (Offer) करतेय. Jio Air Fiber साठी, ग्राहकांना 30Mbps आणि 100Mbps स्पीडचे दोन प्लान मिळतील. त्याची सुरुवातीची किंमत 599 रुपये आहे. या किंमतीत 30Mbps प्लान उपलब्ध असेल.

त्याच वेळी, 100Mbps स्पीड असलेल्या प्लानची ​​सुरुवातीची किंमत 899 रुपये देण्यात आली आहे. या प्लानमध्ये, विशेषत: Netflix आणि Amazon Prime सह तुम्हाला आणखीन 14 पेक्षा जास्त अ‍ॅप्स वापरण्यास परवानगी मिळेल. तुम्हाला 500 हून अधिक डिजिटल चॅनेलमध्ये प्रवेश देखील मिळेल.

त्याचप्रमाणे, Jio AirFiber Max मध्ये, ग्राहकांना 300Mbps ते 1000Mbps स्पीडने इंटरनेट अ‍ॅक्सेस मिळेल. या प्लानची ​​किंमत 11,499 ते 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या योजनांमध्ये, 500 हून अधिक डिजिटल चॅनेलशिवाय, वापरकर्त्यांना 14 हून अधिक अॅप्स वापरण्यास परवानगी मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com