साम टिव्ही ब्युरो
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी Jio AirFiber लाँच होणार आहे.
Jio Air Fiber भारतात हाय स्पीड इंटरनेट सेवा देईल. यामुळे जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल.
एअर फायबर हे एक वायरलेस डिव्हाईस आहे जे वायरशिवाय हाय स्पीड इंटरनेट देईल.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंनुसार हे डिव्हाइसमध्ये दोन युनिट्समध्ये असेल.
एक युनिट जे घर किंवा कार्यालयाच्या छतावर बसवले जाईल. तर दुसरे युनिट घराच्या आत बसवले जाईल.
ज्या ठिकाणी फायबर इंटरनेटमध्ये वायरचा वापर केला जातो, त्यात सिमकार्ड वापरण्यात येणार आहे.
JioAirFiber मध्ये ऑप्टिकल फायबरची गरज भासणार नाही.
JioAirFiber मध्ये 5G नेटवर्क रिसिव्हर असेल ज्याला वाय-फाय सेटअप कनेक्ट होईल. यामध्ये 1Gbps पर्यंत हायस्पीड इंटरनेट सेवा मिळणे अपेक्षित आहे.
जिओ आपला एअरफायबर प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत 20 टक्के कमी किमतीत लॉन्च करू शकतो.