बिझनेस

Jio And Airtel: ₹५०० पेक्षा कमीत रिचार्ज प्लॅन; Jio की Airtel, कोण देतेय जास्त फायदा? वाचा सविस्तर

Mobile Recharge India: जिओचे ग्राहक असल्यास, या श्रेणीत कंपनीकडून मिळणारे रिचार्ज प्लॅन आणि त्यातील खास फायदे जाणून घ्या. हे प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.

Dhanshri Shintre

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज नेहमीच पुढे आहेत. दोन्ही कंपन्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीत रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देतात. विशेषतः ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक फायदेशीर प्लॅन दिले जातात. जिओ आणि एअरटेलचे सर्व असे स्वस्त प्लॅन पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्ही योग्य पर्याय निवडू शकाल.

जिओचा ४४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओचा ४४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरतो. या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता, दररोज ३ जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउड सारख्या अॅप्सचा मोफत वापरही ग्राहकांना दिला जातो.

जिओचा ₹४४८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओचा ₹४४८ रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी अनेक फायदे देतो. या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते आणि दररोज २ जीबी डेटा वापरता येतो. तसेच अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे, या प्लॅनसोबत १२ लोकप्रिय ओटीटी अॅप्सचा मोफत अॅक्सेसही ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो.

जिओचा ३९९ रुपयांचा प्लॅन

जिओच्या या खास प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा वापरण्याची सुविधा मिळते, ज्याची वैधता २८ दिवस असते. त्यासोबतच अमर्यादित कॉलिंगचा लाभ दिला जातो. या प्लॅनचा आणखी एक फायदा म्हणजे जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओक्लाउड अॅप्सचा मोफत अॅक्सेस उपलब्ध करून दिला जातो.

एअरटेलचा ४८९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा ₹४८९ रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरतो. या प्लॅनमध्ये तब्बल ७७ दिवसांची वैधता मिळते. त्यासोबत ६ जीबी डेटा वापरण्याची सुविधा दिली जाते. याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सोय उपलब्ध आहे, ज्यामुळे हा प्लॅन किफायतशीर ठरतो.

एअरटेलचा ४४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा हा खास रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी वैध आहे आणि यात दररोज ३ जीबी डेटा वापरण्याची सुविधा दिली जाते. या प्लॅनसोबत ग्राहकांना २२ लोकप्रिय ओटीटी अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळतो. त्याचबरोबर कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे हा प्लॅन आकर्षक ठरतो.

एअरटेलचा ४२९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन एक महिन्याच्या वैधतेसह उपलब्ध आहे. यात दररोज २.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत एसएमएसची सुविधा दिली जाते. याशिवाय, ग्राहकांना या प्लॅनसोबत अमर्यादित ५जी डेटा वापरण्याचा लाभही मिळतो, ज्यामुळे इंटरनेट अनुभव अधिक वेगवान आणि सोयीस्कर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT