Jio Rs 269 vs Airtel 265 Plan Saam Tv
बिझनेस

Jio चा जबरदस्त प्लान, फक्त 4 रुपयात देत आहे 14GB डेटा; Airtel च्या या प्लानला देतोय टक्कर

Jio Rs 269 vs Airtel 265 Plan: तुम्ही जर 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचा चांगला रिचार्ज प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jio Rs 269 vs Airtel 265 Plan:

तुम्ही जर 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचा चांगला रिचार्ज प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या प्लॅनमध्ये तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटासह एसएमएससह अनेक फायदे मिळतात. Jio आणि Airtel च्या 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लानमध्ये कोणता प्लान बेस्ट आहे, हे जाणून घेऊ...

जिओचा 269 रुपयांचा प्लान

जिओचा 269 रुपयांचा प्लान आहे. ज्यामध्ये JioSaavn Pro चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या प्लानची ​​वैधता 28 दिवसांची आहे आणि यामध्ये एकूण 42 GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर, डेटा स्पीड 64Kbps होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्लानमध्ये JioSaavn Pro व्यतिरिक्त ग्राहकांना JioCloud, JioCinema आणि JioTV वर मोफत प्रवेश मिळेल. या प्लान अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळेल. जर तुमच्या भागात Jio चे 5G नेटवर्क असेल आणि तुमच्याकडे 5G फोन असेल तर या प्लान अंतर्गत तुम्ही अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकता. (Latest Marathi News)

एअरटेलचा 265 रुपयांचा प्लान

एअरटेलच्या 265 रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी दररोज 1 GB हाय स्पीड डेटा ग्राहकांना मिळत आहे. डेटासोबत तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळेल. Jio प्रमाणे या प्लॅनमध्ये देखील डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल. या एअरटेल पॅकसह तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल. त्यानुसार तुम्हाला 28 जीबी डेटा मिळेल. तुम्ही या प्लानसह रिचार्ज केल्यास तुम्हाला मोफत Hellotune आणि Wynk Music चा लाभ मिळेल.

Jio Rs 269 vs Airtel 265 Plan कोणता आहे बेस्ट?

जिओच्या 269 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण 42GB डेटा मिळतो. तर एअरटेलच्या 265 रुपयांच्या प्लानमध्ये 28GB डेटा उपलब्ध आहे. अशातच Jio च्या प्लानमध्ये 4 रुपये अधिक खर्च करून तुम्हाला 14GB अतिरिक्त डेटा मिळत आहे. कॉल आणि एसएमएस दोन्हीचे फायदे समान आहेत. यासोबतच Jio च्या प्लानसोबत JioSaavn चे सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT