ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: कामाची बातमी! आयटीआर फाइल करताना ही कागदपत्रे अनिवार्य; अन्यथा येईल अडचण

ITR Filling Required Documents List: आयटीआर फाइल करताना तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार योग्य फॉर्म निवडला पाहिजे. आयटीआर फाइल करताना तुमच्याजवळ ही कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

Siddhi Hande

आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आयकर विभागाने महिन्याच्या सुरुवातीलाच आयटीआर फॉर्म्स इश्यू केले होते. या फॉर्ममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सरकारने यूनियन बजेटमध्येच टॅक्ससंदर्भातील काही नियमांमध्ये बदल केले होते. यानंतर आता आयटीआर भरण्यास सुरुवात झाली आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म १६ देखील जारी केले आहे. आयटीआर फाइल करताना ही कागदपत्रे खूप आवश्यक आहेत. त्यामुळे आयटीआर भरण्यापूर्वी तुमच्याकडे ही कागदपत्रे आहेत की नाही ते चेक करा.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना हे कागदपत्र गरजेचे (ITR Filling Documents Required)

बँक अकाउंट स्टेटमेंट

बँक टीडीएस सर्टिफिकेट

आधार आणि पॅन कार्ड लिंक असणे अनिवार्य

फॉर्म 26AS

अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट

फॉर्म 16

याआधी फाइल केलेला रिटर्न

सॅलरी स्लीप

भाडेकरार

फॉरेन बँक अकाउंट स्टेटमेंट

परदेशात केलेले ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट

टॅक्स डिडक्शन प्रुफ

टॅक्स सेव्हिंगचा पुरावा

तुम्हाला नवीन करप्रणालीनुसार १२ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाही. दरम्यान टॅक्स सेव्हिंगचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. यामध्ये तुम्ही कोणकोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक केली किंवा लोन वैगेरे याची माहिती द्यावी लागणार आहे.

फॉर्म 26AS आणि AIS गरजेचे

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी तुम्हाला फॉर्म 26AS आणि AIS डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला अधिकृत वेबसाइटवरच मिळेल. या फॉर्ममध्ये तुमचे उत्पन्न, टीडीएस आणि टीसीएसबाबत सर्व माहिती असेल.

आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असते. मात्र, अद्याप आयकर विभागाने या वर्षी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख जाहीर केलेली नाही. परंतु इन्कम टॅक्स फाइल करण्यापूर्वी तुम्हाला आधी हे ठरवावे लागेल की नवीन टॅक्स स्लॅब आणि जुने टॅक्स स्लॅब निवडायचा. त्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स फॉर्म निवडायचा आहे. जर तुम्हाला याबाबत काही समजत नसेल तर टॅक्स एक्सपर्टची मदत घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'मुळशी पॅटर्न'फेम अभिनेत्याला खडसावलं! नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT