इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत आता संपली आहे. ३१ जुलैनंतर आयटीआर फाइल करता येणार नाही. परंतु अजूनही अनेक करदात्यांनी आयटीआर फाइल केलेला नाही. काही करदात्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, तर काहींना वेळ नसल्यावे आयटीआर फाइल करता आला नाही. मात्र, आयटीआर फाइल करता आला नाही तर त्यांनी घाबरायची गरज नाही. त्यांच्यासाठी आयटीआर भरण्यासाठी अनेक पर्याय आहेत.
आयटीआर फाइल करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही.परंतु ज्या करदात्यांनी अजूनही आयटीआर फाइल केला नाही ते लोक आयटीआर फाइल करु शकतात. व्यावसायिक करदात्यांचे आयटीआर फाइल करण्यासाठी विलंब केल्यामुळे नुकसान होणार आहे. ते त्यांचे व्यावसायिक नुकान कॅरी फॉरवर्ड करु शकणार नाहीत.
आता पर्याय काय?
आयटीआर फाइन न केलेले करदाते अजूनही आयटीआर फाइल करु शकतात. त्याला बिलेटेड आयटीआर म्हणतात.परंतु यासाठी त्यांना दंड भरावा लागणार आहे.
३१ डिसेंबर २०२४ पर्यंत दंड भरुन आयटीआर फाइल करण्याचा पर्याय करदात्यांकडे आहे. ५ लाख रुपये उत्पन्न असलेल्या करदात्यांना १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहेय
५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना ५ हजार रुपयांना दंड भरावा लागणार आहे. याचसोबत थकीत करावर दर महिन्याला १ टक्के व्याज भरावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय व्यव्हार करत असलेल्या व्यवसायिकांना ३० नोव्हेंबर ही आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख आहे. आंतरराष्ट्रीय व्यव्हार करत असलेल्या व्यावसायिकांना लेखाजेखा आणि कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे हे कागदपत्र मिळवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे त्यांना आयटीआर फाइल करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.