ITR Filing Deadline meta ai
बिझनेस

ITR Filing Deadline : उरले शेवटचे 4 दिवस! ITR भरताना 'या' 7 चुका टाळा, नाहीतर बसू शकतो मोठा दंड

ITR Filling Deadline July 31 : आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. CA शिवायही रिटर्न भरता येतो. पण AIS, Form 26AS, बँक स्टेटमेंट आणि इतर कागपत्रांची पडताळणी करूनच वेळेत ITR दाखल करा.

Sakshi Sunil Jadhav

जर तुम्ही अजून आयटीआर रिटर्न भरला नसेल तर सरकार शेवटच्या क्षणी मुदत वाढवून देईल अशी अपेक्षा करणं महागात पडू शकतं. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै २०२६ असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट (CA) यांच्या कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे. पण घाबरण्याचं कारण नाही.

जर तुमचे उत्पन्न सॅलरी, व्याज, भांडवली नफा (Capital Gain) किंवा इतर सामान्य स्रोतांमधून असेल तर काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेऊन तुम्ही CA शिवायही स्वत: ITR भरू शकता. पण रिटर्न सबमिट करण्याआधी काही गोष्टींची अंतिम तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे.

आयकर विभागाने ३१ जुलै २०२६ ही ITR भरण्याची अंतिम मुदत ठरवली आहे. उशिरा म्हणजेच ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत उशिरा रिर्टन भरता येईल. तर ३१ मार्च २०२७ पर्यंत सुधारित (Revised) रिटर्न दाखल करता येईल. पण फ्युचर्स अँड ऑप्शन्स किंवा इंट्राडे ट्रेडिंगमधून उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे.

कर तज्ज्ञांच्या मते, Annual Information Statement (AIS) मधली माहिती अंतिम मानू नका. बऱ्याचदा बँकेचं व्याज, FD व्याच, म्युच्युअल फंड व्यवहार किंवा इतर आर्थिक व्यवहार चुकीच्या प्रकारे किंवा दुप्पट दिसू शकतात. त्यामुळे AIS मधील माहितीची बँक स्टेटमेंट , Form 26AS, म्युच्युअल फंड स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रांशी पडताळणी करणं गरजेचं आहे.

संयुक्त मालमत्तेच्या व्यवहारांमध्येही AIS मध्ये संपूर्ण रक्कम एका मालकाच्या नावावर दिसण्याची शक्यता असते. अशा वेळी आयकर पोर्टलवरच्या Feedback या ऑप्शनचा वापर करून योग्य माहिती अपडेट करा. तसेच परदेशात राहणारे भारतीय (NRI) आणि डीम्स रेसिडेन्सीच्या नियमांशी संबंधित करदात्यांनीही आपला निवासी दर्जा आणि DTAA नियमांची योग्य माहिती तपासूनच रिटर्न भरा.

उशिरा ITR भरल्यावर ५,००० रुपयांपर्यंतचा दंड किंवा रक्कम कमी असल्यास त्यानुसार दंड भरावा लागू शकतो. तसेच जुन्या करप्रणालीचा (Old Tax Regime) ऑप्शन गमावण्याची शक्यता, व्यवसाय किंवा भांडवली तोटा पुढे नेण्याचा अधिकार गमावणे आणि थकीत करावर व्याज भरण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता सर्व कागदपत्रांची पडताळणी करून वेळेत ITR दाखल करणेच जास्त फायदेशीर ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

SCROLL FOR NEXT