ITR Filling 2025 Saam Tv
बिझनेस

ITR Filling 2025: उरले शेवटचे ४ दिवस! मोबाईलवरुन अवघ्या काही मिनिटांत फाइल करा आयटीआर; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

ITR Filling 2025 Through Mobile App: आयटीआर फाइल करणाऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. आता तुम्ही मोबाईलवरुनदेखील आयटीआर फाइल करु शकणार आहात. त्यासाठीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटचे ४ दिवस उरले आहे. १५ सप्टेंबर ही आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तुम्हाला दंड आणि त्याचसोबत व्याजदेखील भरावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आयटीआर फाइल करा.

दरम्यान, ज्या करदात्यांनी आतापर्यंत आयटीआर फाइल केला नाही त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता करदाते घरबसल्या मोबाईल अॅपद्वारे आयटीआर फाइल करु शकतात. आयकर विभागाने यासाठी मोबाईल अॅप लाँच केले आहे. यामुळे तुमचे काम सोपे आणि जलद होणार आहे.

मोबाईलद्वारे आयटीआर फाइल करावा

आयकर विभागाने AIS for Taxpayer आणि आयकर सेतू असे दोन अॅप लाँच केले आहे. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. यामुळे तुमचे आयटीआर फाइल करणे सोपे होणार आहे. हे अॅप नोकरदारवर्ग, पेन्शनधारकांसाठी फायदेशीर आहे.

मोबाईल अॅपवरुन आयटीआर कसा फाइल करावा? (How To File ITR Through Mobile App)

तुम्हाला सर्वात आधी अॅप डाउनलोड करायचा आहे.

लॉग इन करा

यानंतर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाका. त्यानंतर पासवर्ड टाकून लॉग इन केला. जर रजिस्ट्रेशन केले नसेल तर पहिले अकाउंट ओपन करा.

ऑटोमॅटिक डेटा मिळेल

लॉग इन केल्यानंतर तुमच्या बँक खात्याची, नियोक्त्याची, म्युच्युअल फंड याबाबत माहिती मिळणार आहे. तुम्हाला यामध्ये बदल करायचे असतील तर करु शकता.

आयटीआर फॉर्म निवडा

यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार आयटीआर फॉर्म निवडायचा आहे.

माहिती चेक करा आणि अपडेट करा

जर तुमची कोणती माहिती चुकीची असेल तर तुम्ही ती बदलू शकतात.यामध्ये एफडीवरील व्याजदर, भाडे याबाबत माहिती भरायची आहे.

ई-व्हेरिफिकेशन करा

यानंतर तुम्हाला आधार ओटीपी आणि नेट बँकिंग किंवा डिजिटल सिग्नेचरद्वारे ई वेरिफाय करायचे आहे. यानंतर रिटर्न जमा झाल्यावर तुम्हाला अॅक्नॉलेजमेंट मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

आयटीआर फाइल करताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी ही माहिती गरजेची आहे. ही माहिती असेल तरच तुम्ही आयटीआर फाइल करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गडचिरोलीत ‘ट्रॅक्टर टेक’ कौशल्य विकास कार्यक्रम सुरू होणार, महिंद्रा अँड महिंद्रा व राज्य शासनाचा सामंजस्य करार

Jamner News : सासू, सासरे व पत्नीचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबईसह ठिकठिकाणी छापेमारी, बॉम्बब्लास्टची होती प्लानिंग?

Flipkart BBD Sale: मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Google Pixel 9 वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत

Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT