आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली
वेळेवर आयटीआर भरल्यास विलंब शुल्क आणि अतिरिक्त व्याज टाळता येते
गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, व्हिसा आणि क्रेडिट कार्डसाठी आयटीआर महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो
वेळेवर ITR भरणे आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता दर्शवते
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयकर रिटर्न भरण्याचा कालावधी सुरू झाला आहे. लाखो करदाते शेवटच्या क्षणापर्यंत रिटर्न भरणे पुढे ढकलतात किंवा टाळतात. पण शेवटच्या क्षणी आयकर पोर्टलवरील प्रचंड ट्रॅफिक आणि तांत्रिक समस्यांमुळे चुकीची माहिती आणि विलंब शुल्काचा धोका वाढू शकतो. यामुळे तुम्हला विलंब शुल्क भरावे लागू शकते. टॅक्स एक्सपर्ट देखील नेहमीच तुमचा आयटीआर वेळेच्या आधी भरण्याचा सल्ला देत असतात. वेळेवर रिटर्न भरण्याचे ३ सर्वात मोठे फायदे आणि रिटर्न भरण्याची शेवटची तारीख काय आहे ते आपण जाणू घेणार आहोत...
टॅक्स भरणाऱ्यांना तारखेनंतर रिटर्न दाखल केल्यास अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागू शकतो. नियमांनुसार जर तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर उशिरा रिटर्न दाखल केल्याबद्दल ५,००० विलंब शुल्क आकारले जाते. तर ज्यांचे उत्पन्न ५ लाखांपर्यंत आहे, त्यांच्यासाठी हा दंड १,००० रुपये आहे. याव्यतिरिक्त, जर तुमची कोणतीही कर थकबाकी असेल, तर कलम २३४ अ अंतर्गत दरमहा १ टक्के किंवा त्याच्या भागावर स्वतंत्र व्याज द्यावे लागते.
जर तुम्हाला शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा मालमत्तेमध्ये भांडवली तोटा झाला असेल तर आयकर नियमांनुसार तुम्ही तो तोटा भविष्यातील वर्षांतील तुमच्या नफ्यातून समायोजित करू शकता. हा तोटा पुढील वर्षांमध्ये पुढे नेण्यासाठी एकमेव अट अशी आहे की तुमचा आयटीआर अंतिम मुदतीपूर्वी दाखल केलेला असावा. यासाठी एक महत्त्वाची अट अशी आहे की, आयटीआर वेळेवर दाखल केला गेला पाहिजे. जर तुम्ही तुमचा आयटीआर अंतिम मुदतीपर्यंत दाखल केला नाही तर बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्ही तो भांडवली तोटा पुढील वर्षांमध्ये पुढे नेऊ शकणार नाही.
आजच्या काळात आयटीआर हे फक्त एक कर दस्तऐवज नसून तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेचा एक भाग म्हणून देखील ओळखला जातो. जेव्हा तुम्ही गृह कर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज किंवा क्रेडिट कार्ड आणि व्हिसासाठी अर्ज करता तेव्हा बँका आणि वित्तीय संस्था तुमच्या मागील काही वर्षांच्या आयटीआर नोंदी पाहून तुमच्या उत्पन्नाचे मूल्यांकन करतात. गृह कर्ज अर्ज, वैयक्तिक कर्ज, शिक्षण कर्ज, व्यवसाय कर्ज, क्रेडिट कार्ड, व्हिसा अर्ज, मोठ्या रकमेचे आर्थिक व्यवहार यांसारख्या प्रकरणांमध्ये, बँका आणि वित्तीय संस्था अनेकदा तुमच्या मागील काही वर्षांच्या आयटीआर नोंदी पाहून तुमच्या उत्पन्नाचे आणि आर्थिक शिस्तीचे मूल्यांकन करतात.
वेळेवर रिटर्न भरणे हे तुमची मजबूत आर्थिक शिस्त दर्शवते. वेळेवर योग्य फॉर्म निवडण्यासाठी आणि चुका टाळण्यासाठी तुमच्या श्रेणीनुसार अंतिम तारीख लक्षात असणे गरजेचे आहे.
- पगारदार कर्मचारी आणि गुंतवणूकदार (ITR-1/ITR-2): ३१ जुलै, २०२६
- फ्रीलान्सर आणि छोटे व्यावसायिक (ITR-3/ITR-4): ३१ ऑगस्ट, २०२६
- कर तपासणी आवश्यक असलेली प्रकरणे: ३१ ऑक्टोबर, २०२६
- विलंबित रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख: ३१ डिसेंबर, २०२६
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.