जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल
आज सोन्याच्या दरात २,००० रुपयांची घसरण झाली
१ किलो चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त झाली
जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर १,४७,२९० रुपये
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सराफा मार्केटमध्ये सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात वाढ होत होती. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आज सोनं आणि चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २००० रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरात ४००० रुपयांची घसरण झाली.
जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं- चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असतानाचे चित्र अद्यापही कायम आहे. गेल्या ८ दिवसांचा जर विचार केला तर सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होताना आपण पाहिला आहे. पण आज ८ दिवसांनंतर सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आज पुन्हा २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २००० रुपयांची तर १ किलो चांदीच्या दरात ४००० रुपयांची घसरण झाली असून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ४७ हजार २९० रुपये इतका झाला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह २ लाख २९ हजार ६९० रुपये इतका झाला आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम हा सोनं आणि चांदीच्या दरावर होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.