NHAI Recruitment Saam Tv
बिझनेस

Infosys -TCS Jobs : सुवर्णसंधी! इन्फोसीस टीसीएससह या आयटी कंपनीत बंपर भरती, ९ लाखांपर्यंत पगार; आताच करा अर्ज

IT Job Search 2024: आयटीमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयटीतील मोठ-मोठ्या कंपन्या लवकरच बंपर भरती करणार आहे.

Priya More

आयटी कंपन्यांमध्ये गेल्या वर्षभरामध्ये मोठी कर्मचारी कपात करण्यात आली होती. आर्थिक मंदीमुळे मोठ-मोठ्या आयटी कंपन्यांनी फ्रेशर्सच्या भरतीवर बंदी घातली होती. पण आता तब्बल वर्षभरानंतर टीसीएस, आयबीएम, इन्फोसिससह जगभरातील मोठ्या आयटी कंपन्यांनी फ्रेशर्ससाठी कॅम्पस प्लेसमेंट भरती (Campus Placements Recruitment 2024) सुरू केली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, Infosys, TCS, IBM, Wipro आणि LTIMindtree यासारख्या मोठ्या आयटी कंपन्यांनी प्लेसमेंटच्या सुरूवातीच्या टप्प्यासाठी कॅम्पसला भेटी देण्यास सुरूवात केली आहे. पण यावेळी निवड प्रक्रिया खूपच वेगळी असणार आहे. ज्या कंपन्या आतापर्यंत भरपूर नोकऱ्या देत होत्या त्या आता निवडक उमेदवारांनाच निवडतील. त्यांना क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा ॲनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञान असलेल्या लोकांची गरज आहे. अशा या पदांसाठी वेतन पॅकेजही ६ ते ९ लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

देशातील कॅम्पस प्लेसमेंट्सच्या प्रक्रियेला जुलैपासून सुरुवात झाली. याशिवाय ऑफ कॅम्पस जॉइनिंगही केले जाणार आहे. याद्वारे TCS ने सुमारे ४० हजार फ्रेशर्स, इन्फोसिस २० हजार आणि विप्रो १० हजार फ्रेशर्स घेण्याचा प्लान आखला आहे. विप्रोचे एचआर प्रमुख सौरभ गोविल यांनी सांगितले की, आम्ही एका वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा कॅम्पस हायरिंग सुरू करणार आहोत. यावेळी कट ऑफ ६० टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. TOI अहवालानुसार, FY24 मध्ये २०२३-२४ आर्थिक वर्षात Infosys कडे ११,९०० कॅम्पस भरती होती जी ५०,००० फ्रेशर्सच्या तुलनेत ७६ टक्क्यांनी घसरली आहे.

या कॅम्पस हायरिंगमध्ये कंपन्या उमेदवारांचे शिक्षण, कौशल्ये, प्रमाणपत्रे तसेच सोशल मीडिया प्रोफाइलवर बारीक नजर ठेवणार आहेत. या माध्यमातून कंपन्यांना तुमची संपूर्ण पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे. अशा परिस्थितीत इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी असणार आहे. नोकरीच्या संधी शोधणाऱ्यांनी आताच मुलाखतीची व्यवस्थित तयारी करून सज्ज राहावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT