Gold Silver Price Today (13th October) Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Today (13th October): महाराष्ट्रात आज सोन्या-चांदीचा भाव किती? जाणून घ्या

Today's (13th October 2023) Gold Silver Rate In Maharashtra : महाराष्ट्रात आज सोन्याचा भाव किती यावर नजर टाकूया.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (13th October):

देशात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण इस्रायल आणि पॅलेस्टाईचे युद्ध. मध्यवर्ती देशांमध्ये सुरु असलेल्या तणावाचा परिणाम कच्चा तेलासह सोन्या-चांदीवरही परिणाम झाला आहे.

आठवड्याभरापूर्वी सोन्याच्या दरात ५००० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. परंतु, युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा ३ हजारांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. येत्या सणासुदीच्या काळात सोनं ६० हजारांवर पोहोचू शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज सोन्याचा भाव किती यावर नजर टाकूया.

1. आजचा सोन्याचा दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार २२ कॅरेट सोन्यासाठी १ ग्रॅमचा भाव ५,४१५ रुपये तर २४ कॅरेटनुसार प्रतितोळ्यासाठी ५९,०६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. सोन्याचा दर हा कालपासून जैसे थेच आहे. काल सोन्याच्या (Gold) दरात प्रति ग्रॅमसाठी ३८० रुपयांनी वाढ झाली होती.

2. चांदीचा आजचा दर

आज प्रति किलो चांदीसाठी ७२,६०० रुपये मोजावे लागणार आहे. चांदीचा दर ही आज जैसे थे च आहे. काल चांदीच्या (Silver) दरात ५०० रुपयांनी वाढ झाली होती.

3. शहरातील आजच्या सोन्याच्या किंमती

मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेटनुसार प्रति तोळ्यासाठी ५८,९१० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये ५८,९४० रुपये प्रति तोळ्यासाठी मोजावे लागतील. नागपूरमध्ये देखील प्रति तोळ्याला ५८,९१० आज मोजावे लागतील. सोन्या-चांदीचे दर आज स्थिर पाहायला मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT