IRCTC Jyotirlinga Yatra saam tv
बिझनेस

IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

Indian Railways Jyotirlinga Yatra : आयआरसीटीसीच्या या विशेष योजनेमुळे भगवान शिवाच्या भक्तांना सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन मिळेल. ही यात्रा नोव्हेंबरमध्ये सुरू होईल.

Bharat Jadhav

  • आयआरसीटीसीने ७ ज्योतिर्लिंगांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे.

  • यात्रा १८ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

  • भारत गौरव ट्रेन पॅकेजची किंमत फक्त ₹२४,१०० आहे.

भारतीय रेल्वेने भगवान महादेवाच्या भक्तांसाठी एक खास पॅकेज जाहीर केलंय. तुम्हालाही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायचे आहे? मग भारतीय रेल्वेनं तुमच्यासाठी एक खास सुविधा सुरू केलीय. या सुविधेचा लाभ घेऊन शिवभक्त परवडणाऱ्या किमतीत सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊ शकतील. आयआरसीटीसीने सात ज्योतिर्लिंग यात्रा सुरू केली असून नोव्हेंबर महिन्याच्या १८ तारखेपासून ही यात्रा सुरू होणार आहे.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या भारत गौरव ट्रेन पॅकेजची किंमत फक्त २४,१०० रुपये आहे. जवळजवळ १२ दिवसांचा प्रवास भाविक अगदी स्वस्त दरात करू शकतील. प्रवासाची सुरुवात योग सिटी ऋषिकेश रेल्वे स्टेशनपासून होणार आहे. या आध्यात्मिक सहलीद्वारे, भाविकांना केवळ पवित्र ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार नाही तर विशेष ट्रेनमध्ये भक्तीमय वातावरणासह आराम देखील मिळेल.

कोणत्या ज्योतिर्लिंगाचे होणार दर्शन ?

12 दिवसांची सहल

ओंकारेश्वर

महाकालेश्वर

नागेश्वर

सोमनाथ

त्र्यंबकेश्वर

भीमाशंकर

घृष्णेश्वर

तसेच द्वारकाधीश आणि बेट द्वारका सारख्या इतर महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्या जातील.

किती असेल भाडे, तिकीट कसं बुक कराल?

हे पॅकेज आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत आउटलेटद्वारे बुक केले जाऊ शकते.

आरामदायी Comfort (२एसी): प्रति व्यक्ती ५४,३९० रुपये

मानक Standard (३एसी): प्रति व्यक्ती ४०,८९० रुपये

इकॉनॉमी Economy (स्लीपर): प्रति व्यक्ती २४,१०० रुपये

पॅकेजमध्ये कोणत्या गोष्टी मिळतील?

निवडलेल्या इकॉनॉमी, स्टँडर्ड किंवा कम्फर्ट श्रेणीनुसार

रेल्वे प्रवाससाह बजेट हॉटेल्समध्ये रात्रीचा मुक्काम आणि बजेट हॉटेल्समध्ये 'वॉश अँड चेंज' ची सुविधा मिळेल.

सर्व जेवण: सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण (फक्त शाकाहारी).

प्रवाशांसाठी प्रवास विमा.

व्यावसायिक टूर एस्कॉर्ट्सच्या सेवा.

आयआरसीटीसी टूर मॅनेजर संपूर्ण प्रवासात प्रवास करतात.

सर्व लागू कर.

दरम्यान स्मारक आणि मंदिर प्रवेश शुल्क, बोटिंग इ.

प्रवास खर्च, प्रवेश शुल्क आणि स्थानिक मार्गदर्शक याचा खर्च प्रवाशांना स्वत:लाच करावं लागेल. ड्रायव्हर्स, वेटर, गाईड, प्रतिनिधींना टिप्स, इंधन अधिभार इत्यादी. लँड्री, वाइन, मिनरल वॉटर, अन्न आणि पेये यासाठी वैयक्तिक खर्च करावं लागेल.

ही यात्रा १८ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि २९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ही यात्रा एकूण ११ रात्री/१२ दिवसांचा असणार आहे. हा प्रवास ऋषिकेश येथील योगा सिटी येथून सुरू होईल. हरिद्वार, लखनऊ, कानपूर आणि इतर स्थानकांवर बोर्डिंग पर्याय उपलब्ध आहेत. तसेच भारत गौरव पर्यटन ट्रेनमध्ये एकूण ७६७ प्रवाशांची क्षमता असणार आहे. प्रवाशांनी चढताना ओळखपत्र आणि कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्र आणणे अनिवार्य असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

SCROLL FOR NEXT