IRCTC ची वेबसाइट डाउन
ऐन दिवाळीत प्रवाशांना तिकीट बुकिंगमध्ये अडथळा
तिकीट बुक झालेच नाही पण पैसे कट झाले आता रिफंड कधी येणार?
दिवाळीमध्ये अनेकजण मुंबईहून आपापल्या गावी जातात.त्यामुळे दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. सध्या ट्रेनमध्ये खूप गर्दी असते. त्यामुळे तुम्हाला आधीच तिकीट किंवा आरक्षण करावे लागते. दरम्यान,रेल्वेचं आरक्षण करण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. आयआरसीटीच्या वेबसाइटवर सर्व्हस डाउन झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
आयआरसीटीसी वेबसाइट डाउन झाल्यामुळे अनेकजण तक्रारी करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी वेबसाइटच्या सर्व्हर डाउनचे फोटो शेअरकेले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीत आणि छठ पूजेआधी तिकीट बुकिंगसाठी अडथळे येत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पेमेंट केलं पण तिकीटचं बुक झालं नाही (IRCTC Down Train Ticket Booking Problem)
आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सर्व्हर डाउनमुळे तिकीट बुक होत नाहीये. दरम्यान, अनेक प्रवाशांनी तिकीट बुक केले त्यांचे पैसेदेखील अकाउंटमधून कट झाले. परंतु त्यानंतर तिकीट बुक झाल्याचेच दिसत नाहीये. यामुळे प्रवाशांना पैसे कधी परत येणार असा प्रश्न विचारला जात आहे. आरआरसीटीसीवर तिकीट बुक करताना जर पेमेंट फेल झाले तर तुम्हाला ३ ते ५ दिवसांत रिफंड मिळतात. कधीतरी रिफंड यायला २१ दिवसांचाही कालावधी लागू शकतो.त्यामुळे प्रवाशांना काळजी करण्याची गरज नाहीये.
जर तुम्हाला रिफंडचे पैसे वेळेवर आले नाही तर तुम्ही IRCTC च्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकतात. तुम्ही care@irctc.co.in च्या वेबसाइटवर जाऊन संपर्क साधू शकतात. फक्त पेमेंट झाल्यावर तुम्हाला त्याचा स्क्रिनशॉट घ्यायचा आहे. हा फोटो तुम्ही त्यांना मेलवर पाठवू शकतात.
IRCTC वेबसाइट डाउन का आहे? (IRCTC Down Reason)
IRCTC ची वेबसाइट डाउन होण्यामागचे कारण समोर आले आहे. एकाच वेळी लाखो युजर्संने लॉग इन केले असल्याने वेबसाइटवर प्रॉब्लेम येत आहे. तत्काल तिकीट बुक करण्यासाठी लाखो प्रवासी प्रयत्न करत होते. एकाच वेळी ५००० पेक्षा जास्त युजर्सने आयआरसीटीसी वेबसाइटवर लॉग इन करु नये, असं सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता ही तिकीट बुकिंग सेवा सुरु झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.