IPS Sanjukta Parshar Saam Tv
बिझनेस

IPS Sanjukta Parshar: लेडी सिंघम! १५ महिन्यात १६ एन्काउंटर करणाऱ्या IPS संजुक्ता परशर आहेत तरी कोण?

Success Story of IPS Sanjukta Parshar: आयपीएस संजुक्ता परशर यांना लेडी सिंघम म्हणून ओळखले जाते. त्यांनी खूप कमी वयात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस आणि आयपीएस ऑफिसर होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आयपीएस होण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. आयपीएस होऊन तुम्हाला प्रशासकीय सेवेत रुजू होत येते. देशाच्या कामासाठी आपला हातभार लावता येतो. असंच काहीसं आयपीएस संजुक्ता परशर यांनीदेखील केले. त्यांनी देशातील अनेक गुन्हेगारांचा एन्काउंटर केला आहे.

लेडी सिंघम (Lady Singham Sanjukta Parshar)

संजुक्ता परशर यांनी लेडी सिंघम म्हणून ओळखले जाते. त्यांनी १५ महिन्यात १६ एन्काउंटर केले आहेत. त्यांच्या या कामामुळे सर्वांनाच त्यांचा अभिमान आहे. सर्वजण त्यांच्याकडे अभिमानाने बघतात.

संजुक्ता परशर यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९७९ मध्ये आसाम येथे झाला. त्यांनी दिल्लीतील इंद्रप्रस्थ कॉलेज ऑफ पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केले. यानंतर त्यांनी जेएनयूमध्ये इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर्स केले. यानंतर फॉरेन पॉलिसीमध्ये एमफिल आणि पीएचडी डिग्री प्राप्त केली. संजुक्ता यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक ८५ प्राप्त केली.

आयरन लेडी ऑफ आसाम (Iron Lady Of Assam)

संजुक्ता परशर या २००६ च्या बॅचच्या आयपीएस ऑफिसर आहेत. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी सन्मानित केले आहे. आयपीएस संजुक्ता परशर यांना त्यांच्या साहसासाठी आसाममधील लोक आयरन लेडी ऑफ आसाम या नावाने ओळखतात.त्यांनी फक्त १५ महिन्यात १६ एन्काउंटर केले.

संजुक्ता यांनी खूप कमी वयात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी देशातील नागरिकांचे संरक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. देशासाठी काहीतरी करायचे म्हणूनच त्या आयपीएस अधिकारी झाल्या. आज त्या एक डॅशिंग आयपीएस म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT