Manasvi Choudhary
कपाळावर पिंपल्स येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. अनेकांच्या कपाळावर पिंपल्स येतात.
कपाळावरील त्वचा ही आपल्या 'T-Zone' चा भाग असते, जिथे तेलाच्या ग्रंथी अधिक सक्रिय असतात यामुळे कपाळावर पिंपल्स येतात.
कपाळावर पिंपल्स येण्याची कारणे नेमकी कोणती आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
कपाळावर पिंपल्स येण्याचे कारण म्हणजे केसांमधील कोंडा. कोंडा कपाळावर पडल्याने तिथली छिद्रे बंद होतात आणि पिंपल्स येतात.
जर तुम्ही केसांना जास्त तेल लावत असाल किंवा केस तेलकट असतील, तर ते तेल कपाळावर उतरते आणि पिंपल्स येतात.
आयुर्वेदानुसार, कपाळाचा संबंध आपल्या पचनसंस्थेशी असतो. जर पोट साफ नसेल किंवा अपचन होत असेल, तर कपाळावर पिंपल्स येतात.
जास्त मानसिक ताण घेतल्याने शरीरातील हार्मोन्स बिघडतात, ज्यामुळे पिंपल्स येतात.
घामाने ओले झालेले हेल्मेट किंवा टोपी सतत वापरल्याने तिथे बॅक्टेरिया वाढतात.