Manasvi Choudhary
त्वचेच्या आयुर्वेदिक गुणधर्मासाठी चंदनाचा वापर केला जातो चंदन त्वचेला थंडावा देते यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
चेहऱ्यावर काळे डाग असतील, चेहरा काळवंडला असेल तर तुम्ही घरगुती पद्धतीने चंदनाचा फेसपॅक बनवा.
चंदनाचा फेसपॅक बनवण्यासाठी चंदन, गुलाब पाणी हे मिक्स करून त्याची पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.
जर तुमच्या चेहऱ्यावर खूप तेल जमा होत असेल किंवा पिंपल्स येत असतील तर चंदन, मुलतानी माती आणि गुलाब पाणी हे मिक्स करून लावा.
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही चंदनासोबत, दुधाची साय आणि हळद हे मिक्स करून चेहऱ्याला लावावे.
काळे डाग आणि चेहऱ्याचे टॅनिंग घालवण्यासाठी तुम्ही चंदन पावडरमध्ये पपई आणि लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्याला लावा
फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा यामुळे चेहऱ्यावरील धूळ, घाण निघून जाईल.