मुंबईत म्हाडाचं फक्त 31 लाखांमध्ये घर; शहरात कुठे कुठे फ्लॅट उपलब्ध? वाचा सविस्तर

Flats In Mumbai Starting At 31 Lakh Under MHADA: मुंबईत म्हाडाकडून ३१ लाखांपासून ८ कोटींपर्यंतच्या ११८ सदनिकांची ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विक्री सुरू. १७ फेब्रुवारी २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू असून घर निश्चित झाल्यानंतर ४८ तासांत १० टक्के रक्कम भरणे बंधनकारक.
MHADA opens direct sale of 118 unsold flats across Mumbai under the first-come-first-serve scheme.
MHADA opens direct sale of 118 unsold flats across Mumbai under the first-come-first-serve scheme.Saam Tv
Published On

मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचे घर राहावे हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. मात्र वाढत चाललेल्या किंमतीमुळे घर घेण्याचे स्वप्न ही आता कोणी बघत नाही. म्हाडामध्ये आता मुंबईतील विविध वसाहतींमध्ये रिकाम्या असलेल्या 118 सदनिकांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाणार आहे. तीन वेळा लॉटरी काढूनही विक्री न झालेली घरे आता ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कडून एकूण १२० घरांच्या विक्री प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून १७ फेब्रुवारी २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

MHADA opens direct sale of 118 unsold flats across Mumbai under the first-come-first-serve scheme.
Accident : मुंबईतील कार्गो परिसरात भयंकर अपघात, गणेशला ट्रकने उडवले, कामगार हादरले

या योजनेत घरांच्या किमती ३१ लाख रुपयांपासून सुरू होऊन तब्बल ८ कोटी रुपयांपर्यंत आहेत. सर्वात स्वस्त घर मानखुर्द (PMGP) येथे सुमारे ३१ लाख रुपयांना उपलब्ध आहे. तर सर्वात महागडे घर क्रिसेंट टॉवर, ताडदेव येथे असून त्याची किंमत सुमारे ८ कोटी रुपये आहे. याशिवाय वडाळा, लोअर परळ आणि अंधेरी या भागांतील घरेही या विक्री प्रक्रियेत समाविष्ट आहेत. म्हाडाने स्पष्ट केले आहे की, 'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर घरांचे वाटप करण्यात येणार आहे. घर निश्चित झाल्यानंतर ४८ तासांच्या आत एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे बंधनकारक असेल.

MHADA opens direct sale of 118 unsold flats across Mumbai under the first-come-first-serve scheme.
JEE Mains Result: डोबिंवलीचा लेक राज्यात पहिला, जेईईमध्ये ९९.९९ टक्के मिळवले

विशेष म्हणजे, ही सर्व घरे यापूर्वी तीन वेळा लॉटरी प्रक्रियेत उपलब्ध करूनही विक्रीस न गेलेली आहेत. त्यामुळे आता थेट विक्री पद्धतीने ही घरे नागरिकांसाठी खुली करण्यात आली असून इच्छुकांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com