Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडिलांच्या निधनानंतर आयुष्य बदललं! ना कॉलेज, ना कोचिंगशिवाय क्रॅक केल्या १२ सरकारी परीक्षा; IPS संदीप चौधरी यांचा प्रवास

Success Story of IPS Sandeep Chaudhary: मेहनत केल्यावर तुम्हाला फळ हे मिळतेच. असेच प्रयत्न आयपीएस संदीप चौधरी यांनी केले आणि त्यांनी यूपीएससीसह १२ सरकारी परीक्षा पास केल्या.

Siddhi Hande

जर तुमची इच्छाशक्ती आणि मेहनत करायची ताकद असेल तर तुम्ही कोणतीही परीक्षा अगदी सहज क्रॅक करु शकतात. मग ती आयुष्याची परीक्षा असो किंवा शिक्षणाची. यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. या परीक्षेत पास होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अशीच मेहनत संदीप चौधरी यांनी केली आणि त्यांनी आयपीएस होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.

वडिलांच्या निधनानंतर आयुष्य बदललं

वडिलांच्या निधनानंतर खूप लहान वयात संदीप यांच्यावर जबाबदारी आली होती. ते कधीच कॉलेजला गेले नाहीत त्यांनी कोणत्याही प्रकारचे कोचिंग घेतले नाही तरीही त्यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी फक्त यूपीएससी नव्हे तर इतर १२ सरकारी परीक्षा पास केल्या.

संदीप चौधरी हे मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत. संदीप बारावीत असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वडील गेल्याच्या दुःखातून सावरत असतानाच ६ दिवसात त्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यांना रोज कॉलेजला जाणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी इग्नूमध्ये प्रवेश घेतला.

१२ सरकारी परीक्षा पास

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पोस्टात क्लर्क म्हणून नोकरी केली. यानंतर त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. एमएच्या पहिल्या वर्षी त्यांनी यूजीसी नेट परीक्षा दिली. यानंतर त्यांनी पोस्ट ऑफिसच्या नोकरीनंतर इतर १० सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिल्या. त्यांनी ६ बँक पीओ, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, बीएएसएफ असिस्टंट कमांडट, नाबार्ड अशा परीक्षा दिल्या आणि पासदेखील केल्या.

यूपीएससी पास (UPSC)

गुवाहाटीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून त्यांनी काम केले. तेव्हाच त्यांचा २०१० मध्ये यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकाल त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या परीक्षेत त्यांनी १३ रँक प्राप्त केली.यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी दिली. त्यानंतर ते आयपीएस अधिकारी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Live News Update: अलिबाग समुद्रात दोन तरुण बुडले, शोध सुरू

Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Maharashra News: महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक; पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

SCROLL FOR NEXT