IPS नुरूल हसन यांचा प्रेरणादायी प्रवास
चौथ्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक
खडतर परिस्थितीवर मात करत झाले IPS
अनेकदा आपली स्वप्ने खूप मोठी असतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. दरम्यान, या प्रवासात अनेकदा अडचणी येतात. कितीही अडचणी आल्या तरी परिस्थितीवर मात करायला हवी, असचं काहीसं नूरूल हसन यांनी केलं.त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी खूप कठीण परिस्थितीत हे यश मिळवले. त्यांचे हे यश सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
नुरूल हसन हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी. त्यांचे वडील शेती करायचे आणि आई गृहिणी होती. त्यांना दोन लहान भाऊदेखील आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती. संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करणे अवघड जात होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांना नोकरी लागली ते शिफ्ट झाले.
नुरूल यांनी सुरुवातीचे शिक्षण गावातून केले. त्यानंतर १२वीला बरेलीमधील मनोहरलाल भूषण कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. यानंतर त्यांना बीटेक करायचे होते परंतु कोचिंगसाठी फी नव्हती. त्यांच्या वडिलांनी जमीन विकून संपूर्ण फी भरली. यानंतर त्यांनी अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले.
बीटेक केल्यानंतर त्यांना एका कंपनीत नोकरी लागली. दरम्यान, त्यांच्या पगारातून कुटुंबाचे पालनपोषण होत नव्हते. त्यामुळे त्यांना भाभा अॅटोमिक रिसर्च इन्स्टिट्यूटची परीक्षा दिली. ही परीक्षा पास झाल्यानंतर त्यांचे सिलेक्शन झाले. ही नोकरी करता करता त्यांना सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याची इच्छा झाली.
नुरूल यांना पहिल्या दोन प्रयत्नात प्रिलियम्सदेखील क्लिअर करता आली नाही. तरीही त्यांन पुन्हा परीक्षा दिली. यावेळी ते इंटरव्ह्यू क्लिअर करु शकले नाही. कितीही अपयश आले तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांची आयपीएस पदावर निवड झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.