Sakshi Sunil Jadhav
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे शिक्षण किती? प्रत्येक महिलांनी ही माहिती नक्की वाचा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतच लोकसभेत आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
निर्मला सीतारामन यांनी तिरुचिरापल्ली येथे असलेल्या सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवीचे (Graduation) शिक्षण पुर्ण केले.
पदवी शिक्षणानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), नवी दिल्ली येथून अर्थशास्त्रात MA आणि M.Phil ही उच्च पदवीचे शिक्षण घेतले.
JNU मध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांची ओळख अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांच्याशी झाली. पुढे दोघांनी 12 सप्टेंबर 1986 रोजी विवाह केला.
परकला प्रभाकर यांनी आंध्र लोयोला कॉलेज, विजयवाडा येथून BA, JNU मधून MA आणि M.Phil, तसेच लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्रात PhD पूर्ण केली आहे.
निर्मला सीतारामन यांनी लंडनमध्ये Agricultural Engineers Association, Price Waterhouse, तसेच BBC World Service येथे अनेक पदांवर काम केलं.
भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील Centre for Public Policy Studies मध्ये उपसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.
निर्मला सीतारामन यांनी PRANAVA नावाची शाळा स्थापन करून शिक्षण क्षेत्रातही योगदान दिलं आहे.