Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सलग तीन वेळा अपयश, कोणत्याही कोचिंगशिवाय चौथ्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; IPS लक्ष्य पांडे यांचा प्रवास

Success Story Of IPS Lakshya Pandey: आयपीएस लक्ष्य पांडे यांचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांना सलग तीन वेळा अपयश आले तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

  • आयपीएस लक्ष्य पांडे यांचा प्रेरणादायी प्रवास

  • सलग तीनदा अपयश आले पण हार मानली नाही

  • यूपीएससी २०२८ मध्ये मिळवली ३१८ रँक

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. दरवर्षी लाखो तरुण ही परीक्षा देतात. परंतु अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. त्यामुळे कितीही अपयश आले तरीही खचून जायचं नाही. असंच काहीसं आयपीएस लक्ष्य पांडे यांनी केलं. सलग तीन वेळा अपयश येऊनदेखील त्यांनी हार मानली नाही. चौथ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले.

IPS लक्ष्य पांडे

आयपीएस लक्ष्य पांडे हे मूळचे उत्तराखंडचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील चंद्र प्रकास पांडे हे चीफ फार्मसिस्ट पदावर कार्यरत होते. आईचे स्वतः चे ब्युटी पार्लर होते. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या आईवडिलांनी त्यांना खूप साथ दिली.

लक्ष्य यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतून केले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील गुरु गोबिंद सिंह इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीमधून बीटेक डिग्री प्राप्त केली. बीटेक करताना त्यांना सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याची इच्छा झाली. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

सलग तीनदा अपयश, चौथ्या प्रयत्नात मिळवलं यश

लक्ष्य यांनी बीटेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.लक्ष्य यांनी सलग तीन वेळा अपयश मिळाले. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे. त्यांनी सेल्फ स्टडीच्या माध्यमातून परीक्षा दिली आहे. त्यांनी आपला आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे.

लक्ष्य यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत ३१८ रँक प्राप्त केली. ते आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते एक तरुण, मेहनती आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune District Bank : भात पिकावर करपा रोगाचे सावट; पुणे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना दिलासा, सरसकट दहा हजाराचे कर्ज

India Tourism : भारतातील 'या' गावी सर्वात आधी सूर्य उगवतो, पहाटे ४ पासून पर्यटकांची होते गर्दी

Maharashtra Live News Update: मेट्रो दोन तासांपासून खोळंबली, मुंबईकरांची कोंडी

Latur : लातूरच्या ढोकी गावात मुसळधार पाऊस, घरांमध्ये पाणी, संसार उघड्यावर, भयानक परिस्थिती | VIDEO

Crime: आधी दारू पाजली, बिर्याणीही खाऊ घातली; नंतर महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केल्याने जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT