प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही अडचणी असतात. परंतु या अडचणींवर मात करुन तुम्हाला पुढे जायचे असते. जर तुम्ही परिस्थितीवर मात करायला हवी. असंच काहीसं इल्मा अफरोज यांनी केलं. त्या २०१८च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी ऑल इंडिया रँक २१७ प्राप्त केली होती.
इल्मा अफरोज या मूळच्या उत्तर प्रदेशमधील कुंदरकी येथील रहिवासी. त्यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. त्यांनी लहानपणापासूनच खूप संघर्ष केला. वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले. त्यांचे कॅन्सरने निधन झाले.
इल्मा यांचे वडील शेती करायचे. त्याशिवाय त्यांच्याकडे उत्पन्नाचे काहीच साधन नव्हते. घरी आई आणि लहान भाई होते. अशा परिस्थितीतही त्यांच्या आईने त्यांना सांभाळलं, मोठं केलं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण केले. लहानपणीच इल्मा यांना शेती करावी लागली होती.
इल्मा अफरोज यांचे शिक्षण
इल्मा अफरोज यांनी सुरुवातीचे शिक्षण मुरादाबाद येथून केले. त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सेंट स्टीफ कॉलेजमधन फिलॉसॉफीमध्ये ग्रॅज्युएशन केले. त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण स्कॉलरशिपच्या जोरावर केला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या.
परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक परीक्षांमध्ये भाग घेतला. त्या अनेक प्रोग्रामसाठी न्युयॉर्क आणि पॅरिसमध्येही गेल्या होत्या.
परदेशातील नोकरी धुडकावली
त्यांनी परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली आणि त्या पुन्हा भारतात परतल्या. त्यांना यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. २०१७ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्या त्यांच्या कामामुळे खूप चर्चेक असतात. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.