
मराठवाडा म्हटलं की दुष्काळ आणि अवकाळी संकंटाचा डोंगर शेतकऱ्यांसमोर असतो.याच संकटावर मात करत धाराशिवच्या परंडा तालुक्यातील आनाळा येथील शेतकऱ्यांनी डाळिंबाची बाग फुलवली आहे.शेतकरी गोकुळ हिवरे यांनी हा प्रयोग केला आहे.त्यांनी यूट्यूब च्या माध्यमातून डाळिंब बागेचे नियोजन केले.
शेडनेट वरील पाणी शेततळ्यामध्ये पोहोचवत तेथून बागेच पाणी नियोजन करण्यात आल.भगवत जातीच्या डाळिंब बागेत अर्धा किलो पर्यंत एक डाळिंब तयार झालं आहे. देशी-विदेशातील बाजारपेठेत आता विक्रीसाठी जात असून यामधून 40 लाखांपर्यंत आर्थिक फायदा होईल असा शेतकऱ्याला अंदाज आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील आनाळा येथील शेतकरी गोकुळ वासुदेव हिवरे यांनी डाळिंबाची शेती करुण लाखो रुपयांचे उत्पन्न काढून इतर शेतकऱ्यांन संमोर आदर्श निर्माण केला आहे. या मध्ये त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रीय खतासह शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर केला. एकीकडे शेतकरी वेगवेगळ्या अडचणीवर मात करून संघर्ष करताना दिसत आहेत तर दुसरीकडे काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या काळानुसार शेती करत असून यशस्वी देखील होत आहेत.
यशस्वी शेतकरी म्हणून आनाळा सह परिसरात ओळख असणारे आनाळा येथील शेतकरी गोकुळ वासुदेव हिवरे यांनी रोपवाटीकेच्या माध्यमातून शेती व्यवसायाला सुरुवात केली त्यांनी आपल्या स्वतः च्या शेतामध्ये वेग वेगळे प्रयोग करत यशस्वी शेती करुन इतर शेतकऱ्या संमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
गोकुळ हिवरे यांनी आपल्या तीन एकर शेत जमीनीवर गेल्या पाच वर्षांपुर्वी दाळींबाची लागवड केली आहे त्यांनी या डाळिंब शेतीमध्ये वेग वेगळे प्रयोग करून डाळींबाचे विक्रमी उत्पादन काढले आहे या वर्षी गोकुळ हिवरे यांनी तीन एकरामधुन 1200 झाडानपासून 35 टन दाळींब घेतले असून या दाळीबांला आज 95 रु प्रती किलो दर मिळत आहे.या वर्षी त्यांनी या पीकावर रासायनिक खते औषधे किटक नाशके व मजुर मिळून पाच लाख रुपये खर्च केला आहे.
या वर्षी त्यांचे तीन एकर डाळिंब बागेतून खर्च जाता 25 लाख रुपयाचे निवळ नफा कमावला आहे.सध्या त्यांच्याकडे तीन एकर डाळिंब बाग असून आणखी चार एकर वर त्यांनी नविन डाळिंब फळबागेची लागवड केली आहे.गोकुळ हिवरे यांना आता पर्यंत शासनाचे विवीध पुरस्कार मिळाले असून यामधे जिल्हा स्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार,आदर्श युवा शेतकरी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पंडीत उधान पुरस्कार मिळाला असुन नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री व राज्यपालांच्या हस्ते त्यांना मुंबई येथे प्रदान करण्यात आला आहे. त्याच बरोबर त्यांनी आपल्या शेतीमध्ये सिताफळ, पेरू, पपई, शेवगा या फळ बागांचीही लागवड केली असून त्या बागेतून देखील त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे त्यांच्या या प्रयोगशिल शेतीमुळे दररोज विस ते तीस मजुर महिला व पुरुषाना रोजगार उपलब्ध झाला आहे.
चार वर्षात 80 लाखाचे उत्पन्न या तीन एकर डाळिंब पीकातुन आतापर्यंत चार वर्षात 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असुन खर्च जाता 65 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. येणाऱ्या काळात सात एकर दाळींब पिकातून प्रती वर्षी एक कोटी उत्पन्न घेणार असल्याचं मनोदय गोकुळ हिवरे यांनी बोलून दाखवला असून त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चालू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.