Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: दहावीत ५७ टक्के, शाळेतून काढून टाकले, तरीही जिद्दीने UPSC क्रॅक केली; IPS आकाश कुल्हरी यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IPS Akash Kulhari: आयपीएस आकाश कुल्हरी यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांना शाळेत कमी गुण मिळाले होते म्हणून काढून टाकले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही. पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

IPS आकाश कुल्हरी यांचा प्रेरणादायी प्रवास

१०वीत असताना शाळेतून काढून टाकले

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

प्रत्येकाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे असते. आपली स्वप्ने पूर्ण करायची असतात. परंतु स्वप्ने पूर्ण करताना अनेक अडचणी येतात. परंतु या अडचणींवर मात करुन तो व्यक्ती पुढे जातो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच काहीसं आकाश कुलहरी यांनी केलं. त्यांनादेखील शाळेत खूप कमी गुण मिळाले होते. मात्र, यामुळे त्यांच्या स्वप्नांवर काहीच परिणाम झाला नाही. याउलट त्यांनी जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली.

शाळेतून काढून टाकले

आकाश कुल्हरी हे मूळचे राजस्थानचे रहिवासी. त्यांनी बीकानेर जिल्ह्यातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना १०वीच्या परीक्षेत खूप कमी गुण मिळाले होते. त्यांना फक्त ५७ टक्के गुण मिळाल होते. यामुळे त्यांना शाळेतून काढूनदेखील टाकले होते. त्यांना पुन्हा शाळेत अॅडमिशनदेखील दिले नाही. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या मेहनतीने यश मिळवले.

दहावीत कमी गुण मिळाल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांचे अॅडमिशन केंद्रीय विद्यालय बीकानेर येथे केले. त्यांनी १२वीला ८५ टक्के गुण मिळवले. यानंतर २००१ मध्ये त्यांनी बी.कॉम केले. यानंतर जवाहरलाल नेहरुन विद्यापीठातून एम.कॉम केले.

पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक (UPSC Success Story)

आकाश कुलहरी यांनी ए.कॉम करतानाच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यांनी २००६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्याआधी त्यांनी एम.फीलदेखील केले होते. यानंतर त्यांची आयपीएस अधिकारी पदावर निवड झाली. आकाश यांच्या प्रवासावरुन आपल्याला हे समजते की, कोणतेही गुण हे आपले यश ठरवू शकत नाही. तुम्हाला यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac financial success: चंद्र मीन राशीत! आज ४ राशींना मिळणार अनपेक्षित यश आणि आर्थिक फायदा

Pune Accident : पुण्यात आमदाराच्या कारने चिमुकलीला उडवले, अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर

Jaggery Sheera Recipe : मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल 'गुळाचा शिरा', फक्त १० मिनिटांत प्रसाद तयार

Maharashtra Live News Update: नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

Bigg Boss Marathi 6 : रितेश देशमुख पुन्हा घेऊन येतोय भाऊचा धक्का; 'बिग बॉस मराठी ६' अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणार, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT