Fixed Deposit Highest Interest Rates List 
बिझनेस

FD Investment Tips: एक नंबर! तुमच्या गुंतवणुकीवर 'या ५ बँका देतील ९.६० टक्के व्याज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महागाईच्या ओझ्यामुळे अनेकांच्या खांदे दबल्या गेलेत आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने बचत कमी प्रमाणात होते, अशा गुंतवणूक करायचं म्हटलं म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाचं असं म्हणावं लागेल. रोजच्या खर्चातून काही पैसे वाचवणे केवळ अवघडच नाही तर अशक्य होतं असतं. त्यामुळे पैसा गुंतवल्यानंतर तो पैसा कसा वाढेल हे आधी पाहिलं जातं. ज्यावेळी गुंतवणूक करण्याचा विचार करण्याचा विचार आपण करतो तेव्हा वेगवेगळे पर्याय पाहून आपण गोंधळून जात असतो.

एफडीमध्ये एक मोठी रक्कम जमा केल्याने तुम्हाला भविष्यात अधिक चांगल्या रिटर्न्स मिळण्याचा फायदा होत असतो. सरकारी बँकांव्यतिरिक्त, खासगी बँकांमध्येही अनेक एफडी योजना आहेत, ज्या ग्राहकांना मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीवर ९.६० % पर्यंत व्याज मिळेल. चला तर कोणत्या बँक आहेत त्याची माहिती आपण जाणून घेऊ.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यासह अनेक गुंतवणुकीचे पर्याय देत असते. सामान्य ग्राहकांना १ हजार दिवसांच्या मुदत ठेवींवर ८.५१ टक्के व्याज दिले जाते. आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९.११ टक्के व्याज दिले जाते.

ESAF स्मॉल फायनान्स बँक

ESAF स्मॉल फायनान्स बँक FD वर ९ टक्केपर्यंत व्याज देते. सामान्य ग्राहकांना २ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर ८.५० टक्के व्याज दिले जाते आणि २ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९ टक्के व्याज दिले जाते.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ९.५०% व्याज देते. सामान्य ग्राहकांना १००१ दिवसांच्या मुदत ठेवींवर ९ टक्के व्याज दिले जाते. तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९.५० % पर्यंत व्याज दिले जाते.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एफडीवर ९ टक्क्यांपर्यंत व्याज देते. ८८८ दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना ८.५० % व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९% व्याज मिळत असते.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सामान्य ग्राहकांना सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून ९.१० टक्के पर्यंत व्याजदर मिळत असते. तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९.६० % पर्यंत व्याजदर दिलं जाते. हे व्याजदर पाच वर्षाच्या एफडीवर दिले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT