Ladki Bahin Yojana money investment saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचे मिळालेले पैसे 'या' ठिकाणी गुंतवा; टॅक्स वाचेल आणि भरभरून रिटर्न्सही मिळतील

Ladki Bahin Yojana money investment: पैशाची गुंतवणूक म्हटली की जोखीम घ्यायची तयारी फारशी कोणाची नसते. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जोखीम घ्यायची नसेल आणि जास्तीत जास्त पैसे कमवायचे असतील तर म्युच्युअल फंड ही एक चांगली योजना ठरू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली. या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतला. या योजनेंतर्गत सर्वसमावेशक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशांची गुंतवणूक कशी करायची याची कल्पना आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पैशाची गुंतवणूक म्हटली की जोखीम घ्यायची तयारी फारशी कोणाची नसते. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जोखीम घ्यायची नसेल आणि जास्तीत जास्त पैसे कमवायचे असतील तर म्युच्युअल फंड ही एक चांगली योजना ठरू शकते. शेअर्समध्ये थेट गुंतवणुकीच्या तुलनेत यामध्ये कमी जोखीम असते. याशिवाय चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.

MF चा परतावा देखील इतर योजनांपेक्षा चांगला मिळतो. मार्केट बेस्‍ड स्‍कीम असल्याने ती फिक्स नसली तरी दीर्घकालीन सरासरी परतावा 12 टक्के असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार आहेत. साधारणपणे यामध्ये केलेली गुंतवणूक कराच्या कक्षेत येते. पण एक अशी योजना आहे ज्यामध्ये टॅक्स बेनिफीट देखील मिळतो. या योजनेला इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ELSS) म्हणतात. या योजनेद्वारे, तुम्ही चांगल्या व्याजाचा लाभ घेऊ शकता आणि टॅक्स वाचवू शकता.

ELSS फंडांमध्ये, एकूण असेटपैकी किमान 80 टक्के इक्विटीमध्ये गुंतवले जातात. जोखीम कमी करण्यासाठी या फंडाचा पैसा वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवण्यात येतो. ELSS मध्ये तुम्हाला तुमच्या बजेट आणि सोयीनुसार योजना निवडण्याची संधी मिळते. यामध्ये तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. त्यामुळे लाडक्या बहिणीचा येणाऱ्या हफ्त्यातील पैसे तुम्ही या ठिकाणी गुंतवू शकता.

तीन वर्षांचा लॉक इन कालावधी

इक्विटी लिंक्ड बचत स्कीम्समध्ये तुम्ही एकरकमी पैसे जमा करू शकता. याशिवाय त्या पैशांची तुम्ही SIP देखील करू शकता. एनएससी, टॅक्स सेव्हिंग एफडी सारख्या योजनांच्या तुलनेत त्याचा लॉक-इन कालावधी कमी आहे. ELSS चा लॉक-इन कालावधी केवळ तीन वर्षांचा आहे, यानंतर तुम्ही जेव्हा हवे तेव्हा पैसे काढू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT