Yojana Saam
बिझनेस

Yojana: मुलीच्या नावाने दररोज फक्त ₹१६७ गुंतवा अन् २८ लाख परत मिळवा, वाचा सरकारची सुपरहिट योजना

Secure Your Daughters Future with Yojana: आपल्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यासाठी भारत सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

Bhagyashree Kamble

मुलीच्या उज्वल भविष्यासाठी आपण विविध योजनेत पैसे गुंतवतो. ज्याचा फायदा आपल्या मुलींना भविष्यात होतो. आपल्या मुलीच्या उज्जवल भविष्यासाठी भारत सरकारने एक योजना सुरू केली आहे. सुकन्या समृद्धी योजना असे योजनेचे नाव असून, ही अतिशय उपयुक्त आणि दीर्घकालीन बचत योजना आहे. दररोज फक्त ₹१६७ (म्हणजे दरमहा ₹५,०००) गुंतवून तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर ₹२८ लाखांचा निधी निर्माण करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना

ही योजना १० वर्षांखालील मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. आपण आपल्या मुलीच्या नावे कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडू शकता. खात्याच्या मॅच्युरिटी कालावधी २१ वर्षे असून, यासाठी आपल्याला आपल्या लेकीच्या नावे १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. उर्वरित ६ वर्षांमध्ये व्याज वाढत राहते आणि संपूर्ण रक्कम मुदतपूर्तीनंतर मिळते. या योजनेत आपल्याला चक्रवाढीचा देखील फायदा मिळतो.

एसएसवाय कॅल्क्युलेटर

जर आपण सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ५,००० रूपये गुंतवले तर, एका वर्षात एकूण ६०,००० रूपयांची गुंतवणूक होईल. १५ वर्षांपर्यंत एकूण गुंतवणूक ९,००,००० रूपयांपर्यंत होईल. यामध्ये तुम्हाला ८.२ टक्के वार्षिक दराने १८, ९३,०५९ रूपये व्याज मिळेल. यानुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम २७,७३,०५९ रूपये म्हणजेच सुमारे २८ लाख रूपये इतकी असेल.

सुकन्या समृद्धी योजना करमुक्त योजना

सुकन्या समृद्धी योजना ही पुर्णपणे करमुक्त योजना आहे. कलम ८०सी अंतर्गत दरवर्षी ₹१.५० लाख पर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट देण्यात आली आहे. योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर नसून, मॅच्युरिटीवरील रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Haldi : हळदीत रंगले स्मृती-पलाश; टीम इंडिया बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Maharashtra Government: आमदार-खासदारांसोबत कसं वागावं? अधिकाऱ्यांसाठी 9 कलमी राजेशाही फर्मान

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT