Inflation Rate Saam TV
बिझनेस

WPI Inflation Rate : सर्वसामान्यांना मोठा झटका, घाऊक महागाईने गाठला १६ महिन्यांतील उच्चांक; नेमकं कारण काय?

WPI Inflation Rate in india : घाऊक महागाईचा दर आता ३.३६ टक्के इतका झाला आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या १६ महिन्यांतील हा उच्चांक दर आहे.

Satish Daud

आधीच महागाईचे चटके सहन करत असलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. घाऊक महागाईचा दर आता ३.३६ टक्के इतका झाला आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या १६ महिन्यांतील हा उच्चांक दर आहे. नुकतीच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जून महिन्यातील घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीतून घाऊक महागाईचा दर वाढला असल्याचं स्पष्ट झालं.

मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात महागड्या भाज्यांमुळे घाऊक महागाईचा दर वाढला आहे. खाद्यपदार्थांच्या (Food) वाढत्या किमतीमुळे घाऊक महागाईचा दर वाढल्याचं बोललं जातंय. उत्पादित अन्नपदार्थ, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू तसेच खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम महागाईच्या दरावर झाला आहे.

विशेष बाब म्हणजे, यापूर्वी मे महिन्यांत घाऊक महागाईचा (WPI Inflation Rate) दर २.६१ टक्के इतका होता. मात्र, जून महिन्यात हाच दर ३.३६ टक्क्यांवर पोहचलाय. तसेच अन्नधान्याचा महागाई दरही जूनमध्ये ८.६८ टक्क्यावर गेला आहे. हाच दर मे महिन्यात ७.४० टक्के इतका होता. यामुळे आधीच महागाईचा मार सोसणाऱ्या जनतेला आणखीच त्रास सहन करावा लागणार आहे.

घाऊक महागाई दर कुठे वाढला अन् कमी झाला?

  • मे महिन्यात प्राथमिक वस्तूंच्या महागाईचा दर ७.२० टक्के इतका होता. जो आता जूनमध्ये ८.८० टक्के झाला आहे.

  • इंधन आणि उर्जा विभागाच्या घाऊक महागाई दरात किंचित घट झाली आहे. हा दर मे महिन्यात १.०३ इतका होता. जो आता जूनमध्ये १.३५ टक्के झाला आहे.

  • उत्पादन उत्पादनांच्या महागाई दरातही वाढला असून १.३४ टक्के इतका झाला आहे. मे महिन्यात हा आकडा ०.७८ टक्के इतका होता.

  • जून महिन्यात अंडी, मांस आणि मासे यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये घट झाली असून ती शून्याच्या खाली गेली आहे. जूनमध्ये अंडी, मांस आणि मासे यांच्या महागाईचा दर -२.१९ टक्के आहे. मे महिन्यात हाच दर १.५८ टक्के होता.

  • जूनमध्ये डाळींच्या महागाईचा दरातही मोठी वाढ झाली असून तो २१.४ टक्यांनी वाढला आहे. ज्यामुळे डाळींचे भाव कडाडण्याची शक्यता आहे.

  • जून महिन्यात किरकोळ महागाई वाढ ५.१ टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT