New Electric Bike Launch Saam tv
बिझनेस

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

New Electric Bike : मॅटर कंपनीने भारतात 'मॅटर एरा' ही गियर असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. १७२ किमी रेंज, स्मार्ट टचस्क्रीन, ४-स्पीड गिअरबॉक्स आणि फक्त २५ पैशांमध्ये प्रतिकिमीचा खर्च यामुळे ही बाईक विशेष ठरते.

Alisha Khedekar

इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी मॅटरने भारतीय बाजारात 'मॅटर एरा' ही नवीन बाईक लाँच केली आहे. कंपनीने या गाडीमध्ये अनेक वेगवेगळे फीचर्स वाहनधारकांना उपलब्ध करून दिले आहेत. ही बाईक इलेक्ट्रिक असूनही त्यात गियर सेटअप उपलब्ध आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत १.९४ लाख रुपये इतकी आहे.

विशेष म्हणजे ही गाडी तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ती ऑनलाईन बुक करू शकता किंवा शोरूमला भेट देऊन बुक करू शकता. कंपनीने बाईकसोबत ३ वर्षांसोबत १ लाख किलो मीटरची वॉरंटी दिली आहे.

'मॅटर एरा' ची वैशिष्टये कोणती ?

मॅटर एराच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचे हायपरशिफ्ट ट्रान्समिशन. या हायपरशिफ्ट ट्रान्समिशनला इनहाऊस डिजाईन केलेले असून ४ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. ही यंत्रणा तीन राईड मोडसह जोडली गेलेली आहे. ज्यामध्ये एकूण १२ गियर मोड कॉम्बिनेशनला परवानगी दिली गेली आहे. कंपनीने या बाईकमध्ये शक्तिशाली बॅटरी आणि मोटार दिली आहे. ही बॅटरी IP६७ रेटेड बॅटरी आहे जी एका चार्जमध्ये १७२ किमी पर्यंत रेंज देते. त्यात बसवलेल्या मोटारमुळे, ० ते ४० किमीचा वेग गाठण्यासाठी फक्त २.८ सेकंद लागतात. कंपनीच्या मते ही बाईक फक्त २५ पैसे या किमतीत चालवता येते.

या मोटरसायकलमध्ये ७ इंचाचा स्मार्ट टचस्क्रीन आहे. ज्यामध्ये नेव्हिगेशन, राईड डेटा, म्युझिक कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहेत. त्यात ओटीए देखील अपडेट करण्यात आला आहे. मॅटर कंपनीच्या अ‍ॅपद्वारे बाईकमध्ये किलेस, रिमोट लाॅक अशा प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT