Indian Railways to suspend all ticket booking and enquiry services nationwide for system maintenance between November 1 and 2. Saam TV News Marathi
बिझनेस

Indian Railways Update: प्रवाशी मित्रांनो कृपया लक्ष द्या! कोणालाच नाही मिळणार तिकीट; चौकशी असो की बुकिंग, सर्व कामं असतील ठप्प

Indian Railways Update IRCTC and CRIS Systems: भारतीय रेल्वे आपल्या सर्व्हेर प्रणाली अपग्रेड करणार आहे. १ नोव्हेंबर रात्री ११:४५ ते २ नोव्हेंबर सकाळी ५:३० वाजेपर्यंत सर्व आयआरसीटीसी आणि सीआरआयएसची सेवा बंद असेल.

Bharat Jadhav

  • प्रवाशांना ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट बुकिंग करता येणार नाहीये.

  • IRCTC आणि CRIS प्रणालीवर कोणतीही चौकशी किंवा तिकीट बुकिंग करता येणार नाही.

  • भारतीय रेल्वेचं रिझर्व्हेशन सिस्टम अपग्रेडसाठी बंद असेन.

जर तुम्ही रेल्वे प्रवास करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला तिकीट बूक करता येणार नाहीये. IRCTC आणि CRIS भारतीय रेल्वे Centre for Railway Information Systemsमार्फत कोणतीच कामे करता येणार नाही. एक नोव्हेंबर रोजी रात्री ११.४५ वाजेपासून २ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजेपर्यंत संपूर्ण देशातील रिझर्व्हेशन सिस्टम तात्पुरती बंद राहणार आहे.

यादरम्यान प्रवाशी तिकीट बुकिंगस, तिकीट रद्द करणे, तात्काळ रिझर्व्हेशन, पीएनआर स्टेटस तपासणं, काही चौकशी करण्याची सेवा पूर्णपणे बंद असणार असतील. दरम्यान प्रवाशांच्या सुविधांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी काम करण्याचे नियोजन करण्यात आलंय. अपग्रेड करणं पूर्ण झाल्यानंतर सर्व सेवा पूर्ववत सुरू केल्या जातील, अशी माहिती भारतीय रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

रेल्वे व्यवस्था का बंद असेल?

कोलकाता येथील आयआरसीटीसी आणि सीआरआयएस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स) च्या सर्व्हरवर डेटा कॉम्प्रेशन आणि तांत्रिक अपग्रेड करण्यासाठी हे बंद केले जाणार आहे. या दरम्यान रेल्वेचे सर्व महत्त्वाचे डेटाबेस, पीएनआर फाइल्स आणि आरक्षण रेकॉर्ड, अधिक सुरक्षित आणि आधुनिक बनवले जाणार आहेत. प्रणाली जलद, स्थिर आणि भविष्यातील डिजिटल गरजांशी सुसंगत करण्यासाठी हे काम आवश्यक असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या सेवांवर परिणाम होईल

इंटरनेट तिकीट बुकिंग (IRCTC वेबसाइट आणि अॅप)

सध्याचे आरक्षण आणि चार्टिंग सिस्टम

तिकीट रद्द करणे आणि परतावा सेवा

१३९ चौकशी सेवा

NTES (National Train Enquiry System)

PRR (Passenger Reservation Record) और EDR (Electronic Data Record

विविध रेल्वे मोबाईल अॅप्स आणि प्रायमस अॅप्लिकेशन

प्रवाशांनी काय करावे?

रेल्वेने प्रवाशांना या काळात तिकिटे बुक करणे किंवा रद्द करणे टाळावे. जर तुमचा प्रवास १ नोव्हेंबरच्या रात्री किंवा २ नोव्हेंबरच्या सकाळी असेल तर तुमची तिकिटे आगाऊ बुक करण्याचा प्रयत्न करावा.

रेल्वे अपग्रेड का आवश्यक आहे?

जलद बुकिंग प्रक्रिया आणि रिअल-टाइम अपडेट्स

सुधारित डेटा सुरक्षा

सर्व्हर डाउनटाइम आणि तांत्रिक अडचणी कमी होतील.

नेटवर्क कामगिरी आणि चौकशी सेवांची गती सुधारली जाईल.

अपग्रेड पूर्ण होताच, सर्व तिकीट आणि चौकशी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू केल्या जातील. भारतात दररोज सरासरी १३ लाखांहून अधिक तिकिटे ऑनलाइन बुक केली जातात. या प्रचंड वाहतुकीला तोंड देण्यासाठी डेटा सिस्टम आणि सर्व्हर क्षमता अपग्रेड करणे आवश्यक असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आलीय. नवीन प्रणाली डेटा प्रक्रिया जलद करेल, बुकिंगसाठी लागणारा वेळ कमी करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak: प्रिया मराठेनंतर 'ही' अभिनेत्री साकारणार 'अ परफेक्ट मर्डर' नाटकात मुख्य भूमिका

वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, दुर्घटनेचा व्हिडिओ आला समोर! १० जणांचा मृत्यू

Beauty Tips: Eyebrowचे केस अचानक गळतायेत अन् बारिक दिसतायेत? मग या टिप्स नका करा फॉलो

Nutrition Tips: डोक्यात वाईट विचार का येतात? या' व्हिटॅमिनची कमतरता असल्यास आरोग्यावर होतो परिणाम

Jay Bhanushali-Mahhi Vij : घटस्फोटाच्या चर्चांवर माही विजने मौन सोडलं, VIDEO शेअर करून सर्व सांगितलं

SCROLL FOR NEXT