IRCTC तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल
आता आरक्षण सुरु झाल्यापासून १५ मिनिटांत बुक करता येणार तिकीट
फ्रॉडपासून वाचण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेकडून रोज हजारो ट्रेन चालवल्या जातात. लांब पल्ल्याच्या ट्रेन ठरावीक वेळेत धावतात.यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, आता रेल्वेच्या नियमांत बदल होणार आहे. रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत १ ऑक्टोबरपासून बदल होणार आहेत.
१ ऑक्टोबरपासून होणार बदल (Railway Ticket Booking Rule Change From 1st October 2025)
१ ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंग सेवेत बदल होणार आहे. यामुळे ऑनलाइन तिकीट बुकिंगवर परिणाम होणार आहे. सध्या लाखो प्रवासी आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटवरुन तिकीट बुक करतात.त्यामुळेच आयआरसीटीने हा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये होणाऱ्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. यामध्ये आता जनरल आरक्षण ओपन झाल्यानंतर सुरुवातीच्या १५ मिनिटांतच तिकीट बुक करु शकतात.ज्यांचे आयआरसीटीसी अकाउंट आधार वेरिफाय असेल त्यांनाच हे तिकीट बुक करता येणार आहे.
जे एजंट्स एकाचवेळी जास्त तिकीट बुक करतात आणि इतरांना विकतात. त्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना तिकीट मिळवणे सोपे होईल. याचसोबत ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रिया पारदर्शक होईल.भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे तत्काळ तिकीट बुक करणेदेखील सोपे होणार आहे. तुम्हाला रजिस्टर खात्यावरुन लॉग इन करायचे आहे. या प्रवाशांना प्राधान्य मिळणार आहे.
आयआरसीटीसीच्या या पाऊलामुळे तिकीट बुकिंगमध्ये कोणतीही फसवणूक होणार आहे. यामुळे कोणताही गैरवापर होणार नाही, असं सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे दलालांना तिकीट बुकिंगमध्ये हेराफेरी करण्यापासून रोखले जाणार आहे.आता प्रवाशांना आयआरसीटी खात्यावरुन आधार कार्ड पडताळणे जाणार आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजल्यापासून ते ८.१५ मिनिटांपर्यंत तिकिट बुक करण्याची परवानगी मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.