Ganeshotsav Special: गणेशोत्सवात रेल्वेत मिळणार उकडीचे मोदक, कुठल्या गाड्यांमध्ये मिळणार विशेष सुविधा?

Dhanshri Shintre

गणेशोत्सव

गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांवर येताच भाविकांची तयारी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.

मुंबई-कोकण प्रवास

आयआरसीटीसीने उत्सवकाळात मुंबई-कोकण प्रवास मधुर करण्यासाठी तेजस व वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोदक वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदक प्रसादाचा आनंद

यामुळे श्रींच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना प्रवासादरम्यानच मोदक प्रसादाचा आनंद घेता येणार आहे.

कोकणवासी

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि मुंबईतील कोकणवासी काही दिवस आधीच गावाकडे निघतात.

मुंबई-गोवा महामार्ग

यामुळे उत्सवाच्या दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावर तसेच रेल्वे प्रवासातही प्रचंड गर्दी पाहायला मिळते.

कुठे मिळणार सुविधा?

सीएसएमटी-मडगाव वंदे भारत (22229/30) आणि तेजस एक्सप्रेस (22119/20) मधील प्रवाशांना मोदक वाटप करण्याचे खास आयोजन करण्यात आले आहे.

कधीपर्यंत वाटप होणार?

बुधवार, २७ ऑगस्टपासून शनिवार, ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीपर्यंत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना मोदक वाटप केले जाणार आहे.

महाव्यवस्थापक

हे माहिती आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी अधिकृतपणे दिली आहे.

NEXT: ठाण्याहून आग्राला कसे पोहोचायचे? वाचा रेल्वे, बस आणि पर्यायी मार्ग

येथे क्लिक करा