Indian Railway Saam Tv
बिझनेस

New Railway Ticket Rule : रेल्वेचा नवा नियम! तिकीट असले तरी भरावा लागू शकतो दंड, प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

Indian Railway Ticket Rules: रेल्वेच्‍या अशा नियमांबद्दल सांगणार आहोत, ज्‍यामुळे तुमची दंड भरण्यापासून सुटका होऊ शकते.

कोमल दामुद्रे

Update on Indian Railway Rules :

भारतात सगळ्यात सोपी व सहजपणे प्रवास करता येणारी वाहतूक व्यवस्था म्हणजे रेल्वे. भारतात कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. काहींचा हा प्रवास रोजचा तर काहींना अगदी कंटाळवाणा वाटतो.

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. आजही लांब ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचे सुविधा ही सोयीची व स्वस्त ठरते. मात्र रेल्वे प्रवास करताना आपल्याला काही नियमांचीही काळजी घ्यावी लागते. जर या नियमांचे पालन झाले नाही तर आपल्याला दंडगी भरावा लागू शकतो. आज आम्‍ही तुम्‍हाला रेल्वेच्‍या अशा नियमांबद्दल सांगणार आहोत, ज्‍यामुळे तुमची दंड भरण्यापासून सुटका होऊ शकते.

1. प्लॅटफॉर्म प्रतीक्षा वेळ

अनेकदा आपण गावी किंवा लांबचा पल्ला गाठताना वेळेपूर्वीच रेल्वे (Railway) स्टेशन गाठतो. पण तुम्हाला माहित आहे का, तिकीट काढल्यानंतरही प्लॅटफॉर्मवर ठराविक काळासाठीच आपल्याला थांबता येऊ शकते. जर तुम्ही या नियमांचे (Rules) पालन केले नाही तर तुमच्याकडून रेल्वे मोठा दंड आकारु शकते. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या अशा नियमांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही प्लॅटफॉर्मवर किती वेळ थांबू शकता व त्याचा नियम काय हे जाणून घेऊया

2. रेल्वेचे दिवस व रात्रीचे नियम वेगळे

जर तुमची ट्रेन दिवसाची असेल तर तुम्ही ट्रेनच्या वेळेच्या दोन तास आधी स्टेशनवर पोहोचू शकता. याशिवाय, जर तुमची ट्रेन (Train) रात्रीची असेल, तर तुम्ही ट्रेन येण्याच्या 6 तास आधी स्टेशनवर पोहोचू शकता.

या वेळेत पोहोचल्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतरही हाच नियम लागू होतो. ट्रेन आल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त 2 तास स्टेशनवर थांबू शकता. पण जर रात्रीची वेळ असेल तर रेल्वे तुम्हाला 6 तास थांबण्याची परवानगी देते.

या नियमाचा फायदा घेण्यासाठी टीटीईच्या मागणीनुसार रेल्वेचे तिकीट दाखवणे आवश्यक असेल. तुम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त रेल्वे स्थानकावर थांबल्यास तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागेल. जर तुम्ही दिवसा ट्रेनच्या वेळेपासून 2 तासांपेक्षा जास्त आणि रात्री ट्रेनच्या वेळेपासून 6 तासांपेक्षा जास्त वेळ थांबलात तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागेल. तुम्ही असे न केल्यास, TTE तुमच्याकडून दंड आकारू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT