Breaking News

August 2023 Holiday List : ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांचा पाऊस, सरकारी कामे असल्यास 'या' दिवशीच उरकून घ्या...

Maharashtra Bank Holidays in August 2023 : यंदा ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याचा पाऊस पडला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
August Month Holiday
August Month HolidaySaam tv
Published On: 

List of Bank Holidays in August 2023 :

नवा महिना सुरु झाला की, आपण सर्वात आधी शोधतो ते सुट्ट्या. यंदा ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याचा पाऊस पडला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यंदा ऑगस्ट महिना सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी सुट्ट्यांचा महिना आहे. या महिन्यात आपण फिरण्यासाठी अनेक नवीन प्लान करु शकतो. ऑगस्ट महिन्यात सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँका १४ दिवस बंद राहातील. त्यामुळे बँका कमी दिवस सुरु राहातील. मात्र या १४ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये ४ रविवार व २ शनिवार यांचा समावेश आहे. यामध्ये ग्राहक ऑनलाइन बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो.

August Month Holiday
Shweta Tiwari : तुझ्या वयालाही सौंदर्य लाजवेल!

1. सुट्ट्या कशा असतील?

या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १२, १३, १५ आणि १६ ऑगस्ट (August) रोजी सुट्ट्या आहेत. या सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांना त्यांची कामे वेळेतच (Time) करावी लागणार आहेत. या महिन्यात ६ ऑगस्ट, १३ २० आणि २७ ऑगस्ट या दिवशी रविवारची सुटी आहे. १२ आणि २६ ऑगस्टला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुटी आहे. १२ ऑगस्टच्या दुसऱ्या शनिवारनंतर १३ रोजी रविवार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि १६ ऑगस्टला पारशी नूतन वर्षाची सुटी आहे. १४ ऑगस्टची रजा घेणाऱ्यांना सलग ५ दिवस सुट्ट्या मिळतील.

August Month Holiday
Benefits Of Morning Walk: दररोज मॉर्निंग वॉक करणे फायदेशीर आहे का?

2. सरकारी कामे लगेच करा

जर तुम्हाला बँकांशी (Bank) किंवा इतर सरकारी कामे लवकर करायची असल्यास तुम्ही या किंवा पुढच्या आठवड्यात करु शकतात. त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या अडचणी देखील कमी होतील व तुमची अनेक कामे लवकर मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com