Railway Job Saam Tv
बिझनेस

Railway Jobs: रेल्वेत १,२०,५७९ पदांसाठी भरती; मागच्या ११ वर्षात लाखो पदे भरली; वाचा सविस्तर

Railway Recruitment 1,20,579 Posts: रेल्वेने मागच्या काही वर्षात लाखो पदांसाठी भरती केली आहे. २०२४-२०२५ साठी १,२०,५७९ पदे भरती केली आहेत.

Siddhi Hande

रेल्वेत मागच्या ११ वर्ष ५.०८ लाख पदभरती

२०२४-२०२५ मध्ये १,२०,५७९ पदांसाठी भरती

विविध माध्यमांतून पद भरती सुरु

रेल्वेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. रेल्वे भरती अनेकदा काढली जाते. मागच्या दोन वर्षात रेल्वेने लाखो पदे भरती केली आहेत. रेल्वेत २०२४-२०२५ मध्ये १,२०,५७९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वे ही खूप मोठे आहे.रेल्वेच्या कामकाजाविषयीचे गां‍भीर्य लक्षात घेवून, रिक्त पदे निर्माण होणे आणि त्यांची भरती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. नियमित कामकाज, तंत्रज्ञानातील बदल, यांत्रिकीकरण आणि नवीन पद्धती यामुळे नवीन पदांसाठी भरती केली जाते. रिक्त पदे प्रामुख्याने रेल्वेकडून भरती संस्थांकडे कार्यात्मक आणि तांत्रिक गरजेनुसार मागणी पाठवून भरली जातात.

सध्या भारतीय रेल्वेमध्ये 2024 आणि 2025 च्या वार्षिक दिनदर्शिकेनुसार 1,20,579 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

स्तर-1 श्रेणीतील 32,438 रिक्त पदांसाठी संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) परीक्षा १४० भाषांमध्ये झाली आहे. रेल्वे संरक्षण दलासाठी (आरपीएफ) हवालदार (कॉन्स्टेबल) पदाच्या 4,208 रिक्त पदांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) १३ नोव्हेंबर पासून सुरू झाली.

तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, पॅरामेडिकल श्रेणी, उपनिरीक्षक (आरपीएफ) आणि सहाय्यक लोको पायलट या पदांसह विविध पदांसाठी 23,000 हून अधिक उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. याशिवाय, 2025 च्या वार्षिक दिनदर्शिकेनुसार 28,463 रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वे भरती बोर्डाच्या अत्यंत परीक्षा तांत्रिक स्वरूपाच्या असतात ज्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, संसाधनांची तजवीज आणि प्रशिक्षण आवश्यक असते. रेल्वेने या सर्व आव्हानांवर मात केली आणि सर्व निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. मागच्या ११ वर्षात रेल्वेने ५.०८ लाख उमेदवारांना नोकऱ्या दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Male Infertility: मधुमेह वाढवतो पुरुष वंध्यत्वाचा धोका? शुक्राणूंच्या आरोग्यावर होणारे परिणाम समजून घ्या

Mumbai-Thane Travel: मुंबई- ठाणे फक्त २५ मिनिटांत, विनासिग्नल प्रवास नेमका कसा होईल?

Bor Fruits Benefits: थंडीत बोरं खाण्याचे फायदे काय?

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओतील तरूण रस्त्यावर? लोकांनी त्याला काठ्यांनी मारलं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT