Indian Navy Recruitment Saam Tv
बिझनेस

Indian Navy Recruitment: १२वी पास तरुणांसाठी खुशखबर; भारतीय नौदलात नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Indian Navy Recruitment 2026: भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मेडिकल ब्रँचमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

Siddhi Hande

भारतीय नौदलात नोकरीची संधी

मेडिकल ब्रँचमध्ये भरती सुरु

पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

भारतीय नौदलात काम करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हालाही नौदलात काम करायचे असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारतीय नौसेनेत मेडिकल ब्रँचमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. SSR Medical-02/2027 बॅचसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल. अर्जप्रक्रिया सुरु झाल्यावर तुम्ही www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

भारतीय नौदलातील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ मार्च २०२६ रोजी सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ मे २००५ ते ३१ ऑक्टोबर २००९ मध्ये झाला असावा. या नोकरीसाठी उमेदवारांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. ट्रेनिंगदरम्यान त्यांना १४,६०० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. यानंतर लेवल ३ नुसार डिफेन्स पे मॅट्रिकनुसार २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे. त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी स्ट्रीममध्ये पास असणे गरजेचे आहे.या नोकरीबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे.

सिलेक्शन प्रोसेस

या नोकरीसाठी सर्वात आधी इंडियन नेव्ही एंट्रस टेस्ट घेतली जाणार आहे. यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील.यासाठी १ तासाचा वेळ दिला जाईल. यानंतर तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर तुमची पुन्हा परीक्षा होणार आहे. यामध्ये इंग्रजी, सायन्स, बायोलॉजी आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला www.joinindiannavy.gov.in वर जायचे आहे.

यानंतर करिअर सेक्शनमध्ये SSR (मेडिकल असिस्टंट)वर क्लिक करायचे आहे.

यानंतर अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा. यासाठी सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर लॉग इन करा आणि सर्व माहिती भरायची आहे.

याचसोबत फोटो आणि शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे अपलोड करायची आहे. यानंतर फी भरुन फॉर्म सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : ऑडिशनदरम्यान प्रायव्हेट व्हिडीओ बनवला, अडल्ट साइटवर टाकून..., प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव

Akola : दाताने उचललं, गरागरा फिरवलं; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भोंदू चेतनविरोधात गुन्हा

Liver Damage Symptoms: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं हे संकेत, वेळीच ओळखा सुरूवातीचे लक्षणे

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी घेतली अजित पवार यांच्या आईची भेट

Fact Check: रसगुल्ला खाल्ल्याने अर्धांगवायूचा झटका? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT