Bank Jobs Saam Tv
बिझनेस

Bank Jobs: इंडियन बँकेत नोकरीची संधी; स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती; अर्ज कसा करावा?

Indian Bank Recruitment 2026: इंडियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन बँकेत सध्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

इंडियन बँकेत नोकरीची संधी

स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर

अर्ज कुठे अन् कसा करावा?

सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. इंडियन बँकेने नवीन भरती जाहीर केली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी ८ एप्रिलपासून अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत. इच्छुक तरुणांनी indianbank.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे.

इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही १३ मेपर्यंत अर्जाची प्रिंट काढू शकतात.

पात्रता (Eligibility)

इंडियन बँकेतील स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २२ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे.

अर्ज कसा करावा?

इच्छुकांनी सर्वात आधी ibpsreg.ibps.in/ibsofeb26/ पोर्टलवर जा.

यानंतर होमपेजवरील न्यू रजिस्ट्रेशनवर जा.

यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करुन माहिती भरा.

यानंतर तुमची सही आणि फोटो अपलोड करा.

त्यानंतर प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

निवडप्रक्रिया

इंडियन बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. याचसोबत उमेदवारांच्या संख्येच्या आधारे ऑनलाइन टेस्ट घेतली जाऊ शकते. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Saturday Horoscope: या ४ राशींच्या आयुष्यात आज महत्त्वाचे बदल घडणार; काम, पैसा आणि नात्यांबाबत मिळणार खास संकेत

SCROLL FOR NEXT