Donald Trump announces 25% import duty on Indian goods Saamtv
बिझनेस

Trump Tariffs: रशियाशी दोस्ती खटकली, डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; अमेरिका भारताच्या वस्तूंवर लावणार 25 टक्के टॅरिफ

Donald Trump imposes 25% import tax on Indian goods: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. भारत अमेरिकेचा मित्र आहे, पण त्यावर २५ टक्के कर आकारला जाईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

Bharat Jadhav

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २५% आयात कर लावण्याची घोषणा केली.

  • त्यांनी भारताला 'मित्र देश' म्हटलं असलं तरी व्यापार धोरणामध्ये कठोर पावले उचलली.

  • या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • भारतातील निर्यातदारांना या कराचा आर्थिक फटका बसू शकतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. भारत अमेरिकेचा मित्र असला तरी त्यावर २५ टक्के कर लावला जाईल. यासोबतच, रशियन लष्करी उपकरणे आणि तेल खरेदी करण्यासाठी दंडही लावला जाईल, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत. भारतावर टॅरिफ लावत असल्याची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी देणारी भाषा केली. दरम्यान भारत आणि रशियाच्या मैत्री अमेरिकाला खटकलीय. भारत गेल्या काही दिवसांपासून रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत होता. त्यामुळे अमेरिकेनं भारतावर २५ टक्के टॅरिफ लावलाय.

भारतातून कापडाची सर्वात जास्त निर्यात होते. अमेरिका अनेक कपडे आणि पादत्राणे भारताकडून खरेदी करते. टॅरिफ लागू झाल्यावर अमेरिकन बाजारपेठेत या वस्तू महाग होतील. त्यामुळे परिणामी भारतीय कंपन्यांच्या ऑर्डर आणि शिपमेंटवर परिणाम होईल आणि निर्यात कमी होईल. त्याचबरोबर भारत हा जगातील सर्वात जास्त हिरा निर्यात करणारा देश आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात दागिने आणि हिऱ्याची निर्यात होते.

भारत अमेरिकेला ऑटोमोबाईल आणि ऑटो पार्ट्सची निर्यात करते. त्यामुळे १ ऑगस्टपासून या पार्ट्सच्या किंमती वाढू शकतात. याचबरोबर भारत दरवर्षी १४ अब्ज डॉलर्सच्या किंमतीचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची निर्यात करत असतो. अमेरिकेच्या टॅरिफ करामुळे हे दर वाढतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेंच्या शिवसेनेचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार; नाराज मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला|VIDEO

Maharashtra Live News Update: अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे भव्य मंदिर बनवा, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी

छुप्या मार्गे गाईंची तस्करी; आरोपीला विवस्त्र करून पोलीस स्टेशनपर्यंत नेलं, नागपूर हादरलं

Cabinet Meeting: ऐन निवडणुकीत फडणवीस सरकारच्या मोठ्या घोषणा, मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय; वाचा सविस्तर...

Dhurandhar Trailer: अ‍ॅक्शन अवतारात दिसणार बॉलिवूडचे 'धुरंधर'; अंगावर काटा येणारा ट्रेलर, डायलॉग ऐकून कराल कौतुक

SCROLL FOR NEXT