India Post GDS Bharti 2026 meta ai
बिझनेस

GDS Bharti 2026: १० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच जाणून घ्या प्रोसेस

India Post GDS Bharti 2026: GDS भरती २०२६ अंतर्गत दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. परीक्षा किंवा मुलाखत नाही.

Sakshi Sunil Jadhav

तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती २०२६ जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड दहावीच्या गुणांवर आधारित संगणकीय गुणवत्ता यादीच्या मदतीने (Merit List) केली जाणार आहे.

या भरतीत ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांचा समावेश आहे. देशातील विविध टपाल मंडळे आणि विभागांमधील रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

वन - टाईम रजिस्ट्रेशन (OTR): ३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर २०२६,सायंकाळी ५ वाजेपर्यंत

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरणा: २ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२६, सायंकाळी ५ वाजेपर्यंत

अर्ज दुरुस्ती : २३ ते २४ सप्टेंबर २०२६, सायंकाळी ५ वाजेपर्यंत

शैक्षणिक पात्रता काय?

अर्जदाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. संबंधित राज्याची स्थानिक भाषा किमान दहावीपर्यंत शिकलेली असणंही महत्त्वाचं आहे.

वयाची अट काय?

पात्र उमेदवारांचं वय अंतिम अर्जाच्या तारखेला १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, OBC उमेदवारांना ३ वर्षे, तर PwBD उमेदवारांना नियमानुसार १० ते १५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा सवलत मिळेल.

किती मानधन मिळणार?

ब्रांच पोस्ट मास्टर : ₹१२,००० ते ₹२९,३८०

ABPM/ डाक सेवक :₹१०,००० ते ₹२४,४७०

याशिवाय महागाई भत्ता, ग्रॅच्युइटी आणि इतर नियमानुसार लाभ मिळतील. GDS साधारण ४ ते ५ तासांचे काम असते. यासाठी अर्ज शुल्क १०० आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT