E Passport Saam Tv
बिझनेस

E Passport: ई-पासपोर्ट कसा असतो? विदेशात जाता येणार का? वाचा

New Passport System India: भारतातून परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची मुख्य गरज लागते. मात्र सध्या भारताने ई-पासपोर्ट बद्दल नागरिकांना जाणून घेण्यास सांगितले आहे. ज्यामुळे प्रवास सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

Tanvi Pol

E-Passport Launch India: भारत सरकारने नुकतच डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ज्यामध्ये बायोमेट्रिक ई-पासपोर्ट सेवा सुरू करण्यात आली आहे. परदेश प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीचा शिवाय जलद करण्यासाठी ही सेवा मोठं पाऊल मानली जाते. पारंपरिक पासपोर्टच्या तुलनेत ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित असून त्यामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

बायोमेट्रिक ई-पासपोर्ट सेवा अजून कोणत्या देशात

चिप-आधारित बायोमेट्रिक ई-पासपोर्ट(passport) तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या देशांच्या यादीत आता भारताचाही समावेश झाला आहे. भारतासह या यादीत कॅनडा, अमेरिका, मेक्सिको शिवाय ब्राझील, इटली, फ्रान्स, जपान यासारख्या तब्बल १२० हून अधिक देशांचा समावेश आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारत देशाच्या सीमांची सुरक्षा अधिक मजबूत होईल. महत्त्वाचे म्हणजे या तंत्रज्ञानामुळे नागरिकांनी कोणते फायदे मिळणार आहेत याची सविस्तर माहिती खाली जाणून घ्या

या पासपोर्टचे काय फायदे आहेत?

बायोमेट्रिक ई-पासपोर्टमुळे नागरिकांना जगभरात प्रवास करणं अधिक सुरक्षित झाले आहे. मात्र, याचा फायदा नेमका काय होतो ते तुम्हाला माहिती आहे का? बायोमेट्रिक ई-पासपोर्टमुळे नागरिकांना प्रवास करताना कोणत्याही मॅन्युअल तपासणीशिवाय ई-गेट्सद्वारे सीमारेषा ही सुरक्षितपणे आणि मुख्य म्हणजे वेगाने ओलांडता येईल. नागरिकांनी मोठ्या रांगते जास्त वेळ थांबण्याची आवश्यकता नाही.

ई पासपोर्ट म्हणजे काय?

मुळात अनेक नागरिकांनी(Citizens) ई-पासपोर्ट म्हणजे नेमके काय ते माहिती नाही. ई-पासपोर्ट म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला असा एक पासपोर्ट. या पासपोर्टमधील जे मागील कव्हर असते ज्यामध्ये विशेष अशी RFID चिप आणि अँटेना बसवलेला असतो. महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीचा पासपोर्ट आहे, त्यांच्या बद्दल सविस्तर माहिती असते. जसे की, नाव, जन्मतारीख, पासपोर्ट क्रमांक आणि त्या व्यक्तीचा फोटो आणि बोटांचे ठस्से. ही सर्व महत्त्वाची माहिती विशेष कोडिंगद्वारे संरक्षित केली असते, त्यामुळे ती सहजपणे कुणालाही वाचता येत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT