India’s first road-cum-rail tunnel: Cars, buses, and trains to run together under one roof. saam tv
बिझनेस

Road Cum Rail Tunnel Project: भन्नाट! एकाच बोगद्यातून धावणार कार, बस अन् रेल्वे; 'या' 3 ठिकाणी होणारे नवे महामार्ग

Road-Cum-Rail Tunnel Project: रेल्वे मंत्रालय आणि महामार्ग मंत्रालय एका अनोख्या प्रोजेक्टवर काम करत आहे. हा प्रकल्प आहे, एकाच बोगद्यातून कार, बस आणि ट्रेन धावणार शकतील, आहे ना कमालीचा आणि भन्नाट प्रकल्प. भारतातील कोणत्या तीन ठिकाणी हे प्रकल्प होणार आहेत.

Bharat Jadhav

  • रेल्वे आणि महामार्ग मंत्रालयाचा भन्नाट संयुक्त प्रकल्प.

  • एकाच बोगद्यातून कार, बस आणि रेल्वे धावणार.

  • या बोगद्यांना रोड-कम-रेल्वे बोगदे म्हणतात.

तुम्ही सोशल मीडियावर युरोपीय देशांमधील असे रोड पाहिले असतील. त्या रोडवरून कार आणि ट्रेन एकाच बोगद्यातून जातात. अशा प्रकल्पांना रेल्वे-कम-रोड बोगदे म्हणतात. आता अशी बोगदे आपल्या देशात होणार आहेत. हो,अगदी बरोबर वाचलात तुम्ही दोन मंत्रालय या प्रोजेक्टवर काम करत आहेत.

गेल्या काही वर्षांत एनएचएआयने महामार्ग बांधकामाचा झपाट्याने विस्तार केलाय. त्यामुळे राज्ये आणि शहरे यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुलभ झालीय. आता देशात नवीन प्रकल्प चालू आहे. एनएचएआय आणि रेल्वे मंत्रालयाकडून तीन रेल्वे कम रोड बोगदे बांधण्याचे नियोजन केले जातंय.

एकाच बोगद्यातून एकाच वेळी चारचाकी वाहने आणि रेल्वे धावणार

रेल्वे-कम-रोड बोगद्यांतून महामार्ग आणि रेल्वे लाईन जाणार आहे. एका बाजूला वाहने तर दुसऱ्या बाजूला रेल्वे रुळावरून ट्रेन धावतील. एनएचएआय आणि रेल्वे मंत्रालय रेल्वे-कम-रोड बोगद्यांवर काम करणार आहेत. यामुळे प्रवास पूर्वीपेक्षा सोपा आणि सुरक्षित होईल. तसेच यामुळे खर्च कमी होईल आणि पर्यावरणाचे नुकसानदेखील कमी होईल, असं तज्ञांचे म्हणणे आहे.

तीन प्रकल्प कोणते असतील?

पहिला रेल्वे-कम-रोड बोगदा प्रकल्प ईशान्येकडील "चिकन नेक" कॉरिडॉरसाठी असेल. हा सिलिगुडी परिसर आहे, जो भारताला ईशान्येशी जोडतो. हा २२ किमी लांबीचा बोगदा नियोजित आहे. दुसरा प्रकल्प आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याखालून जाणार एक बोगदा असेन. जो गोहपूर आणि नुमालीगडला जोडतो. तिसरा प्रकल्प कर्नाटकातील मारनहल्ली-अड्डाहोल (शिराडी घाट) परिसरात असेन. येथे राष्ट्रीय महामार्ग-७५ वर २१ किमीचा बोगदा बांधला जाणार आहे.

टाइम्सच्या वृत्तानुसार रेल्वे आणि रस्ते मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काही दिवसापूर्वी बैठक घेतली. दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये या तिन्ही प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली आहे. दोन्ही मंत्रालयांकडून फिजिबिलिटी स्टडी करण्यास सुरुवात झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flood Relief Help Scam : अकोल्यात शेतकऱ्यांची थट्टा! मदत म्हणून ३ ते २१ रुपयांचा चेक, ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर सरकारला जाग

Hair Care: केस खूप गळतायेत, कोरडे आणि पांढरे होतायेत? मग हा १ पदार्थ ठरेल बेस्ट, होतील दाट आणि चमकदार केस

Marathi Actress On Rohit Arya Case: अन् मी थोडक्यात वाचले...; रोहित आर्यचा 'या' मराठी अभिनेत्रीला जाळ्यात ओढण्याचा डाव फसला

Amruta Khanvilkar Photos: काय होतीस तू, काय झालीस तू... अभिनेत्री 'चंद्राचा' नवा लूक, हटके स्टाईलमधील फोटोशूट चर्चेत

Paneer Biryani Recipe: रेस्टॉरंटसारखी घरच्या घरी कुकरमध्ये बनवा मऊ अन् झणझणीत पनीर बिर्याणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT