
महाराष्ट्रात होणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पात एक महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे. घणसोली ते शिळफाटा दरम्यान समुद्राखाली बांधल्या जाणाऱ्या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा पहिला भाग तयार झाला आहे. हा पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक भाग होता. ही ट्रेन कोणत्या मार्गावर धावेल आणि तिचे तंत्रज्ञान, वेग आणि किंमत काय आहे ते जाणून घ्या.
हा ५०८ किमी लांबीचा प्रकल्प भारत आणि जपानमधील एक महत्त्वाचा भागीदारी आहे. या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे देशातील भविष्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पांनाही चालना मिळणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे. रेल्वे मंत्रालयाने सोमवारी एक प्रेस नोट जारी केली. त्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक मोठा टप्पा गाठल्याचं सांगण्यात आले आहे.
बीकेसी आणि ठाणे दरम्यानच्या २१ किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचा पहिला भाग पूर्ण झालाय. रुळ टाकण्याचे, ओव्हरहेड इलेक्ट्रिकल वायर्सचे, स्टेशन आणि पुलांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रातील कामालाही वेग आला आहे. या मार्गातून बुलेट ट्रेन कोणत्याच अडथळ्याशिवाय ३२० ते ३५० किमी वेगाने धावणार आहे.
संपूर्ण मार्गावर बांधकामे (सिव्हिल) वेगाने सुरू आहेत. ३१० किमीचा व्हायडक्ट(पारसेतू) तयार झालाय. नदीवरील १५ पूल पूर्ण झाले असून, ४ पूल बांधकामाच्या प्रगत टप्प्यात आहेत. १२ पैकी ५ स्थानके पूर्ण झाली आहेत आणि आणखी ३ स्थानके आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. बांद्रा येथे शानदार स्टेशन उभारण्यात येणार आहे. हे स्थानक जमिनीखाली ३२.५ मीटर खोल असेल. त्यावर ९५ मीटर उंच इमारत उभी केली जाणार आहे, अशी पायाची रचना केली जाणार आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, देशातील पायाभूत सुविधा युद्धपातळीवर सुधारित केल्या जात आहेत. आतापर्यंत, एकूण ५०८ किमी पैकी ३१० किमी बांधकाम पूर्ण झाले आहे आणि १५ नद्यांवर पूल यशस्वीरित्या बांधण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.