gold news  saam tv
बिझनेस

Types Of Gold Carat : बाजारात आलंय नवं सोनं; दागिन्याची किंमत ५० टक्क्यांनी स्वस्त, जाणून घ्या माहिती

Types Of Gold Carat News : बाजारात नवीन सोनं आलं आहे. या दागिन्याची किंमत ५० टक्क्यांहून स्वस्त आहे.

Vishal Gangurde

Types Of Gold Carat : सोन्याला भारतीय पंरपरा आणि संस्कृतीत महत्वाचं स्थान आहे. लग्न सोहळा ते धार्मिक कार्यक्रमात लोक सोन्याचे दागिने आवर्जुन परिधान करतात. भारतात उत्तम दर्जाचं सोनं २२ कॅरेट सोन्याला मानलं जातं. मात्र, २२ कॅरेट सोनं महाग आहे. मात्र, आता बाजारात सर्वसामान्यांसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. आता बाजारात ९ कॅरेटच्या सोन्याला मान्यता मिळाली आहे.

ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे राजेश रोकडे यांनी सांगितलं की, 'सोन्याचा भाव वाढल्याने श्रीमंत वर्गच सोने खरेदी करताना दिसतो. त्यामुळे काही सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे स्वप्न ठरू लागले आहे. बाजारात ९ कॅरेटचं सोनं बाजारात आलं आहे. ९ कॅरेटचं सोनं स्वस्त, टिकाऊ आणि स्टायलिश आहे. सध्या दररोज रोज गोल्ड आणि व्हाइट गोल्डची मागणी वाढत चालली आहे'.

'९ कॅरेट सोन्यामध्ये इतर धातूंचाही वापर केला जातो. यामुळे सोन्याचा रंग फिका पडत नाही. या ९ कॅरेटच्या सोन्यामध्ये पांपरिक दागिने देखील मिळतात. तसेच सर्व प्रकारचे दागिन्याचे मिळतील, असे रोकडे यांनी सांगितलं.

किती प्रकारचे सोने बाजारात उपलब्ध आहेत?

२४ कॅरेटचं सोनं ९९.९ टक्के शुद्धतेसाठी ओळखलं जातं.

२२ कॅरेट सोनं ९१.६ टक्के शुद्धतेसाठी ओळखलं जातं.

१८ कॅरेटचं सोनं ७५ टक्के शुद्ध असतं. या कॅरेटच्या सोन्यापासून मॉडर्न ज्वेलरी तयार केली जाते.

१४ कॅरेटचं सोनं ५८.५ टक्के शुद्ध असतं. या सोन्याचाही वापर दागिन्यांसाठी करतो.

१० कॅरेटमध्ये ४१.७ टक्के सोनं शुद्ध असतं.

९ कॅरेटमध्ये ३७.५ टक्के सोनं शुद्ध असतं.

सामान्यपणे सोन्याच्या दागिन्यांसाठी बाजारात २२ कॅरेटचं सोन्याचा वापर केला जातो. तर २४ कॅरेट सोन्याची नाणे किंवा बिस्किट तयार केले जातात. श्रीमंत वर्गात सोन्याचे बिस्किट खरेदी करण्याची मोठी क्रेझ आहे. मध्यम वर्गीय आणि युवा वर्गांमध्ये १८ कॅरेट, १४ कॅरेट आणि आता ९ कॅरेट सोन्याची मोठी मागणी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT