ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: ३१ जुलैपूर्वी ITR फाइल करु शकला नाहीत? होऊ शकतो तुरुंगवास; जाणून घ्या सविस्तर

ITR Filling : आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत आता संपली आहे. अंतिम मुदतीनंतर तुम्हाला आयटीआर भरता येणार नाही. यासाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. दंड भरण्यासोबतच तुम्हाला जेलदेखील होऊ शकते.

Siddhi Hande

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. ३१ जुलैपर्यंत जवळपास ७ कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर फाइल केला आहे. परंतु ज्या करदात्यांनी अजूनही आयटीआर फाइल केला नाही त्यांना दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही आयटीआर भरला नसेल तर तुम्हाला जेलदेखील होऊ शकते.

आयकर रिटर्न भरण्याची मुदत आता संपली आहे. ज्या लोकांनी आयटीआर भरले नाही ते लोक ३१ डिसेंबरपर्यंत आयटीआर भरु शकतात. परंतु त्यांना यासाठी दंड भरावा लागणार आहे. यालाच बिलेटेड म्हणजेच विलंबित आयकर रिटर्न म्हणतात. हा आयटीआर फाइल करताना तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तसेच कराच्या रक्कमेवर व्याजदेखील भरावे लागणार आहे. प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम 234F नुसार, विलंबित रिटर्न फाइल करताना करावर दरमहिन्याला १ टक्के व्याज भरावे लागेल.

दंड किती भरावा लागणार?

कलम 234F नुसार, बिलेटेड रिटर्न भरण्याचा दंड करदात्यांच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित असतो. जर करदात्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यांना आयटीआर फाइल करताना १,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. तर ज्या करदात्यांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना ५,००० रुपये आहे.

आयटीआर फाइल न केल्यास काय होईल?

आयटीआर फाइल न केल्यास करदात्यांना दंड भरावा लागणार आहे. जो करदाता आयटीआर रिटर्न फाइल करणार नाही त्याला आपल्या चालू वर्षाचा लॉस कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही. याशिवाय आकर विभाग दंड ठोठावू शकतो. हा दंड कराच्या ५०% ते 200% पर्यंत असू शकतो. उच्च मूल्याच्या प्रकरणांमध्ये रिटर्न फाइल न केल्यास न्यायालयीन कारवाई किंवा तुरुंगवासही होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणेंची जादू पुन्हा चालणार का? एक्झिट पोल काय सांगतो?

Maharashtra Exit Poll: श्रीवर्धनचा गड आदिती तटकरे राखणार? VIDEO

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Maharashtra Exit Poll : विक्रोळी मतदारसंघात सुनील राऊत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT