Income Tax Return Filing Last Date saamtv
बिझनेस

Income Tax Return: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आता आयटीआरचा परतावा काही तासांत येणार

Income Tax Return Filing Last Date: आयटीआर भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. आधी परतावा येण्यासाठी २० दिवस ते ३-४ महिने लागायचे, आता अनेक प्रकरणांमध्ये परतावा फक्त २४ तासांत येणार आहे.

Bharat Jadhav

  • आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • आयटीआर-२ आणि आयटीआर-३ फॉर्म आता पोर्टलवर उपलब्ध आहेत.

  • १५ सप्टेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून उशिरा भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो.

या आर्थिक वर्षासाठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झालीय. ता वेबसाइटवर आयटीआर-२ आणि आयटीआर-३ फॉर्म देखील सक्रिय झाले आहेत. यामुळेच आता मोठ्या संख्येने लोक त्यांचे आयटीआर दाखल करत आहेत. जर तुम्ही आयटीआर भरला नसले तर १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयटीआर दाखल करा, नाहीतर आयटीआर उशिरा दाखल केल्यास दंड होऊ शकतो आणि परतावा देखील उशिराने मिळेल.

यावेळी विशेष म्हणजे आयकर विभाग खूप वेगाने परतावा पाठवत आहे. आधी परतावा येण्यासाठी २० दिवस ते ३-४ महिने लागायचे, आता अनेक प्रकरणांमध्ये परतावा फक्त २४ तासांत किंवा ५ ते १० दिवसांत येत आहे. जर तुम्ही अजून रिटर्न दाखल केले नसेल तर १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयटीआर दाखल करू शकतात. पण जर उशिरा आयटीआर दाखल कराल दंड होऊ शकतो. याशिवाय परतावा मिळण्यासही उशिर होऊ शकतो.

आयटीआर कसा दाखल करायचा?

incometax.gov.in](https://incometax.gov.in) या वेबसाइटला भेट द्या.

पॅन टाकून लॉगिन करा

"ई-फाइल" टॅबवर जा आणि "इन्कम टॅक्स रिटर्न" फॉर्म निवडा

करार वर्ष (२०२४-२५) निवडा.

तुमची श्रेणी निवडा (व्यक्ती/HUF/इतर)

ITR-1, ITR-2, ITR-3 किंवा ITR-4 फॉर्म निवडा.

सर्व तपशील भरा आणि शेवटी ई-व्हेरिफाय करा.

आयटीआर दाखल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत ई-व्हेरिफाय करा, अन्यथा तुम्हाला परतावा मिळणार नाही.

कोणते कागदपत्र लागतात?

पॅन आणि आधार कार्ड

बँक स्टेटमेंट

फॉर्म १६ (जर पगारदार असेल तर)

देणगी पावत्या (जर कर सवलत मिळवायची असेल तर)

स्टॉक ट्रेडिंग स्टेटमेंट (जर गुंतवणूक केली असेल तर)

पॅन लिंक्ड बँक खाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : मोठी बातमी! भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलट्या बोंबा; भारतावरच केला मोठा आरोप

GST Reform: आता GST मध्ये फक्त 2 स्लॅब, नवीन दर 22 सप्टेंबरपासून होणार लागू

Apple Cider Vinegar: त्वचेवर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर लावल्याने कोणते परिणाम होतात?

IAS Transfers List : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरुच; कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT