Income Tax Saam TV
बिझनेस

ITR Filing Eligibility: वार्षिक उत्पन्न ७ लाखांपेक्षा कमी असेल तर आयटीआर भरावा का? जाणून घ्या सविस्तर

Income Tax Return Eligibility For Below 7 Lac Net Income: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. आयटीआर फाइल करताना अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यात आयटीआर कोणी फाइल करावा? हा एक प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राप्तीकर विभागाने आयटीआर भरण्यास सांगितले आहे. ३१ जुलै २०२४ ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही वेळेत आयटीआर भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आयटीआर भरताना अनेकांना मनात प्रश्न असतात. आयटीआर कोणी भरावा? आयटीआर दाखल करण्यासाठी आपले वार्षिक उत्पन्न किती असणे गरजेचे आहे? असे अनेक प्रश्न पडलेले असतात.

जर तुमचे वार्षिक उत्पन्न ७ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आयटीआर भरावा लागेल. जुन्या प्रणालीअंतर्गत ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना आयटीआर भरावा लागत असे. मात्र, नवीन प्रणालीअंतर्गत ७ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांनाच आयटीआर भरावा लागणार आहे.

जरी तुम्ही करदात्यांमध्ये समाविष्ट नसाल. तुमचे उत्पन्न ७ लाखांपेक्षा जास्त नसेल तरीही तुम्ही आयटीआर फाइल करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला अनेक सुविधा मिळणार नाही. जर तुमचा टीडीएस किंवा टीसीएस २५ हजारांपेक्षा जास्त कापला जात असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे अनिवार्य आहे. जर तुम्ही परदेशात जाऊन पैसे कमावले असतील आणि प्रवासावर २ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर तुम्हाला आयटीआर दाखल करावा लागेल.

जर तुमचा टीडीएस किंवा टीसीएस कापला गेला असेल तर तुम्ही आरटीआर परतावा मिळण्यास पात्र ठरतात. जर तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही आयटीआर भरला नाही तर तु्म्हाला १ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.तसेच तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही आयटीआर भरला नाही तर तुम्हाला ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

Hair Care : सिल्की आणि शायनी केसांसाठी वापरा ही सोपी ट्रिक, हे आहेत घरगुती उपाय

Pune : मोठी बातमी! पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

SCROLL FOR NEXT