Railway Recruitment: रेल्वेत ७,९११ पदांसाठी मोठी भरती; पात्रता काय? असा करा अर्ज

RRB Junior Engineer Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर रेल्वेमध्ये मोठी भरती आहे. रेल्वेत ७,९११ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam Tv
Published On

अनेकांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. सरकारी नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. रेल्वे भरती बोर्डाने हजारो पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ज्युनिअर इंजिनियर पदासांठी ही भरती केली जाणार आहे. जवळपास ७९११ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या भरतीमध्ये डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (DMS), केमिकल आणि मेटलर्जिकल पर्यवेक्षक या पदांसाठीही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज करु शकणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया, परिक्षेची तारीख आणि पात्रता जुलै-ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.

रेल्वे भरती बोर्डाने ७,९११ ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी भरती केली जाणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. याशिवाय अर्जदाराचे वय १८ ते ३३ वर्ष असायला हवे.

Railway Recruitment
Government Scheme: ५ लाखांची गुंतवणूक करा अन् काही महिन्यांनी १० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत आजच गुंतवणूक करा

अर्ज प्रक्रिया

अधिकृत नोटीफिकेशन जारी झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होईल. पात्र उमेदवार त्यांचे अर्ज आरआरबीच्या (RRB) वेबसाइटवर सबमिट करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच सांगण्यात येईल.

RRB JE 2024 साठी अर्ज कसा करावा

यासाठी तुम्हाला RRB च्या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर JE नोंदणी २०२४ या लिंकवर क्लिक करा. यानंतर लॉग इन करा आणि अर्ज भरा. अर्ज भरण्यासाठी स्वतः ची माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा. यानंतर हा फॉर्म डाउनलोड करुन ठेवा.

Railway Recruitment
Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

निवड प्रक्रिया

भरती प्रक्रियेसाठी संगणक आधारित चाचणी (Computer Based Test 1 आणि 2) असे दोन टप्पे असतील. यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना सिलेक्ट केले जाईल. याबाबत अधिसूचना लवकरत जारी करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com