Income Tax Refund meta ai
बिझनेस

Income Tax Refund : आयकर रिफंड ऑनलाइन कसा तपासाल? जाणून घ्या सोपी पद्धत

AY 2026-27 ITR Refund: AY 2026-27 साठी ITR भरल्यानंतर आयकर रिफंडचा दावा केला असेल तर ऑनलाइन Refund Status कसा तपासायचा, ई- व्हेरिफिकेशननंतर प्रक्रिया किती वेळ घेते जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

जर तुम्ही आर्थिक वर्ष 2026-27 साठी आयकर रिटर्न (ITR) भरला असेल आणि तुमच्याकडून प्रत्यक्ष देय टॅक्सपेक्षा जास्त टॅक्स भरला गेला असेल, तर तुम्हाला Income Tax Refund मिळू शकतो. पण रिटर्न भरल्यानंतर लगेच रिफंड मिळत नाही. आधी ITR ई-व्हेरिफाय होणे आणि त्यानंतर आयकर विभागाकडून रिटर्नची प्रोसेस पूर्ण होणे आवश्यक असते.

आयकर रिफंड म्हणजे काय?

करदात्याने भरलेला एकूण टॅक्स त्याच्या अंतिम कर दायित्वापेक्षा जास्त असेल तर आयकर रिफंड तयार होतो. हा कर TDS, TCS, Advance Tax किंवा Self-Assessment Tax च्या माध्यमातून भरलेला असू शकतो.

उदाहरणार्थ, तुमचे अंतिम कर दायित्व (Final Tax Liability) ₹५०००० आहे. पण TDS आणि Advance Taxच्या माध्यमातून तुम्ही ₹७०००० भरले असतील, तर प्रोसेसनंतर तुम्हाला ₹२०,००० रिफंड मिळण्याची शक्यता आहे.

रिफंड मिळण्याची प्रक्रिया कशी होते?

रिफंडची सामान्य प्रक्रिया ही ITR दाखल - ई-व्हेरिफिकेशन - रिटर्न प्रक्रिया - रिफंड निश्चित - रिफंड खात्यात जमा अशी असते. आयकर विभागाच्या माहितीनुसार, ITR ई-व्हेरिफाय झाल्यानंतर रिफंड प्रोसेसला साधारण ४ ते ५ आठवडे लागू शकतात. प्रत्यक्ष कालावधी रिटर्नच्या तपशीलानुसार बदलू शकतो.

AY २०२६-२७ चा Refund Status कसा तपासाल?

सर्वात आधी अधिकृत Income Tax e-Filing Portal वर जा. PAN किंवा User ID आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. e-File - Income Tax Returns - View Filed Returns या पर्यायावर जा. पुढे यादीतून AY 2026-27 साठी दाखल केलेला ITR निवडा. शेवटी संबंधित रिटर्नसमोर View Details वर क्लिक करा. यानंतर रिटर्नची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे, रिफंड ठरला आहे का, जारी झाला आहे का किंवा काही कारणामुळे अडचण आली आहे का, याची माहिती पाहता येते.

लक्षात ठेवा

फक्त ITR मध्ये रिफंडचा दावा केला म्हणून रिफंड मंजूर झाला असे मानू नका. रिटर्नची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच अंतिम रिफंडची रक्कम ठरवली जाते. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी रिटर्न फक्त ITRमध्ये रिफंडचा दावा केला म्हणून रिफंड मंजूर झाला असे मानू नका. रिटर्नची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम रिफंडची रक्कम निश्चित होते. त्यामुळे AY 2026-27 साठी रिटर्न भरल्यानंतर त्याचे ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करून वेळोवेळी Refund Status तपासणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती शहरातील प्रगती नगर येथे बारा वर्षीय मुलीची आत्महत्या

BEST Salary Hike: खुशखबर! बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ; सातव्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

Mobile Ban: राज्यातील प्रमुख मंदिरात मोबाईल वापरण्यास बंदी; विजय सरकारनं का घेतला निर्णय?

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होणार का? भाजपच्या बड्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य

Pakistan : पाकिस्तानी लष्करावर भीषण हल्ला; बलुचिस्तानमध्ये २५ जवान ठार, गाड्या पेटवल्या अन्...

SCROLL FOR NEXT